UPSC Result l केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून, यावर्षी महाराष्ट्राचा अर्चित डोंगरे देशात तिसऱ्या क्रमांकावर येत चमकदार यश मिळवलं आहे. शक्ती दुबे याने देशात पहिला क्रमांक पटकावला असून, हर्षिता गोयल दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या निकालानंतर महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण असून, अर्चित डोंगरे याच्या यशाचा सर्वत्र गौरव होत आहे. त्याने अवघ्या महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे.
UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 – टॉपर्स यादी :
शक्ती दुबे
हर्षिता गोयल
अर्चित पराग डोंगरे (महाराष्ट्र)
शाह मार्गी चिराग
आकाश गर्ग
कोमल पूनिया
आयुषी बन्सल
राज कृष्ण झा
आदित्य विक्रम अग्रवाल
मयंक त्रिपाठी
UPSC Result l 1009 उमेदवारांची निवड, IAS, IPS, IFS मध्ये नेमणूक :
UPSC CSE 2024 च्या अंतिम निकालात एकूण 1009 उमेदवारांची निवड झाली असून, त्यांची IAS, IPS, IFS, IRS आणि इतर केंद्र सरकारच्या सेवांमध्ये नेमणूक होणार आहे. या परीक्षेच्या मुलाखती जानेवारी ते एप्रिल 2025 दरम्यान पार पडल्या होत्या. आयोगाने यासोबत 230 उमेदवारांची राखीव यादी देखील प्रसिद्ध केली आहे.
अर्चित डोंगरे याचं हे यश केवळ वैयक्तिक नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. UPSC परीक्षेसाठी लागणारी चिकाटी, अभ्यासपद्धती आणि मानसिक संतुलन त्याने यशस्वीरित्या साधलं. त्याचं हे यश हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरणार आहे.






