UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, 1 तारखेपासून होणार मोठा बदल

On: January 29, 2025 5:27 PM
UPI Transactions With Special Characters To Be Blocked From 1st February NPCI Circular
---Advertisement---

Transactions | आजकाल यूपीआय (UPI) म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (Unified Payments Interface) माध्यमातून पेमेंट (Payment) करणे खूप सामान्य झाले आहे. भाजीपाल्याच्या स्टॉलपासून (Vegetable Stall) ते मोठमोठ्या मॉल्स (Malls), दुकानांपर्यंत (Shops) पैसे देणे या माध्यमातून सोपे झाले आहे. (Transactions )

जर तुम्हीही यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) 1 फेब्रुवारीपासून काही विशिष्ट प्रकारचे व्यवहार ब्लॉक (Block) करणार आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) एक परिपत्रक (Circular) जारी करून 1 फेब्रुवारीपासून विशेष कॅरेक्टर्सने (Special Characters) तयार केलेल्या आयडीसह (ID) व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती दिली आहे. वापरकर्ते (Users) केवळ अल्फान्यूमेरिक कॅरेक्टरसह (Alphanumeric Characters) तयार केलेल्या आयडीद्वारे व्यवहार करू शकतील. जे टेक्निकल स्पेसिफिकेशन (Technical Specification) फॉलो करणार नाहीत, अशा लोकांचा आयडी ब्लॉक केला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

यूपीआय व्यवहार वाढविण्याचे उद्दिष्ट

एनपीसीआयने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे जेव्हा रिटेल पेमेंट ऑपरेटरने (Retail Payment Operator) व्यवहारांसाठी यूपीआय पर्यायाचा वापर वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर भारतात डिजिटल व्यवहारात (Digital Transactions) वेगाने वाढ झाली. (Transactions )

स्पेशल कॅरेक्टर वापरावर बंदी

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यापूर्वीच लोकांना यूपीआय आयडीसाठी स्पेशल कॅरेक्टर्सऐवजी अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर वापरण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर अनेकांनी तसे बदल केले, पण तरीही काही वापरकर्ते अद्याप त्याचे पालन करत नाहीत. आता एनपीसीआय त्याचे पालन करण्यासाठी कठोर पावले उचलणार आहे. जेणेकरून यूपीआय ट्रान्झॅक्शन आयडीमध्ये कोणीही कोणतेही स्पेशल कॅरेक्टर वापरणार नाही. (Transactions )

यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार अगदी सहजपणे केले जातात. त्यामुळे त्याचा वापरही वाढत आहे. डिसेंबर 2024 पर्यंत यूपीआय व्यवहारांची संख्या 16.73 अब्जांवर पोहोचली होती. थोडक्यात, 1 फेब्रुवारीपासून यूपीआय आयडीमध्ये स्पेशल कॅरेक्टर वापरणाऱ्यांचे व्यवहार ब्लॉक होणार आहेत. त्यामुळे यूपीआय वापरकर्त्यांनी लवकरात लवकर आपल्या आयडीमध्ये आवश्यक ते बदल करून घ्यावेत.

Title : UPI Transactions With Special Characters To Be Blocked From 1st February NPCI Circular

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now