थोड्याच वेळात अर्थसंकल्पाचा पेटारा उघडणार; कुणाला काय मिळणार?

On: February 1, 2025 10:51 AM
Budget 2025
---Advertisement---

 Budget 2025 l केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि. 1 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर करणार असून, त्या सलग 8व्यांदा बजेट सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत.

2019 मध्ये भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर त्यांनी सात अर्थसंकल्प सादर केले असून, आजचा अर्थसंकल्प त्यांच्या कारकिर्दीतील आठवा अर्थसंकल्प असेल.

मोरारजी देसाईंच्या विक्रमाच्या दिशेने… :

स्वातंत्र्यानंतर 26 नोव्हेंबर 1947 रोजी आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक 10 अर्थसंकल्प सादर केले आहेत.

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात त्यांनी 1959 ते 1969 दरम्यान एकूण 6 पूर्ण आणि 4 अंतरिम अर्थसंकल्प मांडले होते.

 Budget 2025 l 10 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होणार? :

आजच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या करसवलतीसह उत्पन्न मर्यादा ₹7 लाखांवरून ₹10 लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. तसेच, ₹15 लाख ते ₹18 लाख या उत्पन्न गटासाठी 25% कर दर लागू केला जाऊ शकतो, तर ₹18 लाखांवरील उत्पन्नावर 30% कर आकारला जाऊ शकतो.

अर्थसंकल्प 2025 मध्ये काय अपेक्षित? :

मध्यमवर्गीयांसाठी दिलासा: करसवलत वाढवण्याची शक्यता.

महिलांसाठी विशेष योजना: नवीन गुंतवणूक आणि कर्ज सवलती.

शेतकऱ्यांसाठी मदत: पीएम किसान सन्मान योजनेच्या निधीत वाढ.

व्यवसाय आणि स्टार्टअप्स: MSME साठी नवीन सवलती जाहीर होण्याची शक्यता.

News Title: Union Budget 2025: Nirmala Sitharaman to Present 8th Budget, Tax-Free Income Up to ₹10 Lakh?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now