Union Budget 2025 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी 3.0 सरकारचा दुसरा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला आहे. या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार वर्ग, व्यापारी आणि उद्योजकांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्री सीतारामण यांनी विविध क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या असून, काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत, तर काही महागल्या आहेत. तसेच, वैद्यकीय शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे. (Union Budget 2025)
जीवनावश्यक औषधांवरील कर सवलत, कॅन्सर उपचार होणार स्वस्त
सरकारने 36 महत्त्वाच्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवली आहे, त्यामुळे कॅन्सरवरील उपचार अधिक परवडणारे होणार आहेत. यामुळे लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
काय स्वस्त होणार?
LED दिवे आणि टीव्ही
भारतात बनवलेले कपडे
मोबाईल फोनच्या बॅटऱ्या
इलेक्ट्रिक वाहन (EV)
LCD टीव्ही
लेदर जॅकेट, बूट, बेल्ट, पर्स
हँडलूम उत्पादन
काय महागणार?
आयात केलेले मोबाइल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू
सोने आणि चांदीवरील कर वाढवला
परदेशातून येणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क वाढले
वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा
मेडिकल कॉलेजमध्ये 75,000 नवीन जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, त्यामुळे डॉक्टरांची संख्या वाढेल. IIT मध्ये 6,500 नवीन जागा निर्माण केल्या जाणार आहेत, ज्यामुळे तंत्रज्ञान शिक्षणाला चालना मिळेल. AI आणि डिजिटल क्षेत्रात मोठी गुंतवणूक
देशात 3 नवीन AI Excellence Centers स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, स्टार्टअप आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे.
डाळींच्या उत्पादनात स्वावलंबनासाठी सरकारचा मोठा निर्णय
डाळींसाठी 6 वर्षांचा विशेष कार्यक्रम राबवला जाणार आहे.
तूर, उडीद आणि मसूर उत्पादनावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना हाती घेतली जाणार आहे.
Title : Union Budget 2025 Medical Seat Increased LED & Cancer Drugs Get Cheaper






