‘अब की बार भाजप तडीपार, हुकूमशाहीचा अंत करा’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

On: March 17, 2024 9:06 PM
Uddhav Thackeray
---Advertisement---

Uddhav Thackeray | मुंबईमध्ये इंडिया आघाडीची आज सभा पार पडली. या सभेतून इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपला देशाची घटना बदलण्यासाठी चारशे पारचा नारा दिला आहे. चारशे पार म्हणायला ते काय फर्निचरचं दुकान आहे का?, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

मी तर म्हणतो अब की बार भाजप तडीपार करून हुकूमशाहीचा अंत करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. खरं पाहिलं तर हा एक फुगा आहे आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं, असं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) म्हटलंय.

“फुग्यामध्ये आम्ही हवा भरली”

संपूर्ण देशात त्यांचे दोन खासदार होफुग्यामध्ये आम्ही हवा भरलीते. त्या फुग्यामध्ये आम्ही हवा भरली आणि त्यांच्या डोक्यामध्ये हवा गेली, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

आज देशभरातून सगळ्या राज्यातून महत्त्वाचे नेते नेते इथे आलेत आणि आपल्याला असं वाटत असेल की ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रमध्ये तसं नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ही परिस्थिती सगळी सारखीच आहे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

मोदीजी तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती आरोप करता तेव्हा तुमच्या घरांना मी प्रकाशजींच्या भाषेत बोलत नाही, पण तुमच्या परिवारामध्ये फक्त तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढा तुमचा परिवार आहे बाकी परिवार आहे कुठे?, अशी टीका त्यांनी केली.

आपण लढाई लढतोय ती लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आणि ज्या संविधानाबद्दल शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे याची सुरुवात कोर्टापासून करा, असंही ठाकरेंनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला

बाळासाहेब ठाकरेंना राहुल गांधींकडून पहिल्यांदाच अभिवादन!

भाजपची मोठी खेळी; सोलापुरातून मोठी बातमी समोर

अखेर ठरलं! सांगलीची जागा शिवसेनेकडेच, ‘हा’ नेता लढणार निवडणूक

सर्वात मोठी बातमी! महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now