Uday Kotak | देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai) रिअल इस्टेटमध्ये (Real Estate) एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. हा सौदा कोणत्याही बॉलीवूड सेलिब्रिटीने (Bollywood Celebrity) नाही, तर उद्योग जगतातील (Business World) एका दिग्गजाने केला आहे. देशातील सर्वात श्रीमंत बँकर (Richest Banker) आणि कोटक महिंद्रा बँकेचे (Kotak Mahindra Bank) संस्थापक उदय कोटक (Uday Kotak) यांनी मुंबईत एक-दोन नव्हे, तर तब्बल 400 कोटी रुपयांना संपूर्ण इमारतच खरेदी केली आहे.
वरळीत (Worli) खरेदी केली इमारत:
उदय कोटक यांनी मुंबईतील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरळी भागात ही संपूर्ण रहिवासी इमारत (Residential Building) खरेदी केली आहे. 400 कोटी रुपयांच्या या खरेदीमुळे देशातील रिअल इस्टेटमध्ये एक नवा विक्रम नोंदवला गेला आहे. उदय कोटक यांनी या इमारतीमधील सर्व रहिवाशांकडून त्यांची घरे विकत घेतली आहेत. (Uday Kotak)
इमारतीचा तपशील:
कोटक परिवाराने खरेदी केलेली ही इमारत दोन मजली असून, त्यात एकूण 24 फ्लॅट (Flats) आहेत.
30 जानेवारी रोजी 24 पैकी 12 फ्लॅटची खरेदी उपनिबंधक कार्यालयात (Sub-Registrar Office) करण्यात आली.
या इमारतीमधील एक सौदा डिसेंबर महिन्यात झाला होता, तर उर्वरित सौदे लवकरच होण्याची शक्यता आहे.
ज्या लोकांचे सौदे अद्याप झालेले नाहीत, त्यांना टोकन (Token) देण्यात आले आहे.
फ्लॅटची किंमत आणि दर:
वरळीमधील या इमारतीतील सर्वात मोठा फ्लॅट 1,396 स्क्वेअर फूटचा (Square Foot) असून त्याची किंमत 38.24 कोटी रुपये आहे.
173 स्क्वेअर फुटांच्या सर्वात लहान घराची किंमत 4.7 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
कोटक कुटुंबियांनी या इमारतीतील घरे सुमारे 2.72 लाख रुपये प्रति चौरस फूट दराने खरेदी केली आहेत.
कोणत्याही मालमत्तेच्या व्यवहारासाठी (Property Deal) देशात दिलेली ही सर्वाधिक किंमत आहे.
दक्षिण मुंबईतील अल्टामाऊंट रोडवर (Altamount Road) देशातील सर्वाधिक प्रति चौरस फूट दर 2.25 लाख रुपये आहे, तर भुलाभाई देसाई रोडवर (Bhulabhai Desai Road) हा दर 2.09 लाख रुपये प्रति चौरस फूट आहे. (Uday Kotak)
Title : Uday Kotak Buys Entire Building in Mumbais Worli for 400 Crore






