Today Horoscope | आज 8 ऑक्टोबररोजी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी आज रात्री 11 वाजून 19 मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर षष्ठी तिथी सुरु होईल. आज राहू काळ 3 वाजता सुरु होईल ते 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल. यासोबतच आज मंगळवारी नवरात्रीचा सहावा दिवस आहे. आजचा रंग लाल असून देवीच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाईल. तर आज देवी कात्यायनी तुमच्या राशीत काय घेऊन येणार, ते पाहुयात. (Today Horoscope)
आजचे राशी भविष्य
मेष : तुमच्या प्रेमळ स्वभावाचा तुम्हाला फायदा होईल. आज व्यवसाय संबंधी एखादी मोठी डील पक्की होईल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. सासरच्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. वाहन चालवताना खबरदारी घ्यावी. (Today Horoscope)
वृषभ : राजकारणात तुम्हाला मोठं पद मिळू शकतं. आपला सन्मान वाढेल. लहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. आजचा दिवस प्रसन्न जाईल. मोठ्या जबाबदारी अंगावर पडतील, त्याचा तुम्ही आनंदाने स्वीकार कराल.
मिथुन : आज तुमच्यावर देवी कात्यायनीची अपार कृपा राहील. तुम्हाला सर्व कामात यश मिळेल. मित्रांशी असलेले नाते घट्ट होईल. जोडीदारासोबतचे तुमचे संबंध आणखी सुधारतील. आज धार्मिक ठिकाणी भेट द्याल. यामुळे मानसिक शांतता मिळेल.
कर्क : घरातील वातावरण खेळकर राहील. तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. परदेशात शिक्षणासाठी जायची संधी मिळेल. त्यामुळे आजचा दिवस कायम स्मरणात राहील. कुटुंबासोबत आज वेळ व्यतीत कराल. (Today Horoscope)
सिंह : आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची संभावना आहे. अचानक प्रवास करावा लागेल. हवे असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. आपला प्रभाव वाढेल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. छोटे प्रवास लाभदायक ठरतील. (Today Horoscope)
News Title : Today Horoscope 8 October 2024
महत्वाच्या बातम्या-
रेल्वे विभागात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
… तर त्यांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत; राज ठाकरेंचा टोला
आम्ही कुठेही पोरी देत नसतो; शरद पवार असं का म्हणाले?
अभिजीत गेम हरला, तरीही मिळाले सुरज पेक्षा जास्त पैसे; आकडा पाहून व्हाल थक्क






