Today Horoscope | आज 23 ऑक्टोबररोजी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी दुपारी 1 वाजून 19 मिनिटांपर्यंत राहील. तर गुरुवारी पहाटेपर्यंत म्हणजेच 5 वाजून 52 मिनिटांपर्यंत सिद्ध योग राहील. आज राहू काळ 12 वाजता सुरु होऊन 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल. आज 12 पैकी सिद्धी योगात काही राशींवर धनवर्षाव होण्याची शक्यता आहे. आता या राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात. (Today Horoscope)
आजचे राशी भविष्य
सिंह रास : आज तुम्हाला जवळची व्यक्ती भेटेल. महत्वाकांक्षेला चांगला वाव मिळेल. तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. नवीन काम करण्यास सुरुवात कराल. दिवसाची सुरुवात शुभवार्ताने होईल.
कन्या रास : तुमच्या आरोग्यात थोडीफार सुधारणा संभवते. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची देखील संभावना आहे. आज दिवसभर प्रसन्न राहाल.(Today Horoscope)
तूळ रास : तुमच्यावर आज मोठ्या जबाबादऱ्या पडतील. नोकरीच्या ठिकाणी तुमचे प्रमोशन होईल. कापड व्यवसाय करणाऱ्यांना फायदाच फायदा होईल. महिला वर्गाला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठबळ मिळेल. आज तुम्हाला मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक रास : कामाची दगदग वाढेल. स्वत:साठी काही वेळ काढावा. अडथळ्यातून मार्ग काढाल.मित्रांशी भेट होईल. गप्पा-गोष्टीमध्ये रमून जाल. तुमच्या पार्टनरसोबत सुसंवाद होईल. यामुळे आनंदी असाल. खूप दिवसापासून अडकलेले पैसे आज परत मिळतील.
धनू रास : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आवडत्या वस्तूंची खरेदी कराल. खूप दिवसांपासून फिरायला जायचा केलेला प्लॅन आज सत्यात उतरेल. मित्रांसोबत धमाल कराल. आजचा दिवस आनंदी आणि स्मरणात राहण्यासारखा जाईल.(Today Horoscope)
News Title : Today Horoscope 23 October
महत्वाच्या बातम्या –
“माझे गुरु मला घरी बोलवायचे आणि ते मला…”, कुस्तीपटू साक्षी मलिकच्या खुलाशाने खळबळ!
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार; एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार?
भाजपला विदर्भात मोठा धक्का! बडा नेता राष्ट्रवादीत






