विनायक राऊतांना अटक करा! ‘या’ व्यक्तीने केली मागणी

On: July 12, 2026 5:53 PM
Vinayak Raut (1)
---Advertisement---

Vinayak Raut | ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि त्यांच्या कुटुंबाविरोधातील प्रकरणात आता आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता त्यांच्या आई पूजा पवार (Pooja Pawar) यांनीही माध्यमांसमोर भूमिका मांडत विनायक राऊत यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, आपल्या मुलीला न्याय मिळावा आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

तीन वर्षे तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याचा दावा :

ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाणे (Kapurbawdi Police Station) येथे गिरीजा राऊत यांच्या तक्रारीनंतर विनायक राऊत, त्यांचे पुत्र गितेश राऊत (Gitesh Raut) आणि इतर कुटुंबीयांविरोधात कौटुंबिक छळासह जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पूजा पवार यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबाने गेली तीन वर्षे चर्चा आणि गाठीभेटींद्वारे हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना वेळच दिला गेला नाही.

पूजा पवार यांनी विनायक राऊत यांनी केलेले आर्थिक मागण्यांचे आरोपही फेटाळून लावले. टेरेस फ्लॅट, दरमहा पाच लाख रुपये किंवा इतर आर्थिक मागण्या केल्याचा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर पैशांचाच हेतू असता, तर एवढी वर्षे शांत बसलो नसतो, असे त्या म्हणाल्या. तसेच, गितेश राऊत यांच्याकडून गिरीजाला शिवीगाळ आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचाही त्यांनी आरोप केला.

Vinayak Raut | अंधश्रद्धा आणि वैवाहिक आयुष्याबाबत गंभीर आरोप :

पूजा पवार यांनी दावा केला की, मुलगी सासरी सुखाने राहावी, एवढीच त्यांची इच्छा होती. मात्र, परिस्थिती सुधारण्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धेच्या गोष्टी केल्या गेल्या. या सर्व प्रकरणात विनायक राऊत यांचीही भूमिका तपासली जावी आणि त्यांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी त्यांनी वैवाहिक आयुष्याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केला. शारीरिक संबंधच होत नसतील, तर मूल कसे होणार, असा सवाल त्यांनी केला. डॉक्टरांकडे उपचार घेण्याचा सल्ला आम्ही वारंवार दिला होता, मात्र त्याऐवजी अंधश्रद्धेच्या मार्गाचा अवलंब करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. तसेच, गिरीजाला फोनवर बोलतानाही स्पीकर सुरू ठेवण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा करत मुलीचा गैरफायदा घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

News Title : Girija Raut Mother Seeks Vinayak Raut Arrest

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now