शरद पवारांचा शिंदे गटाला धक्का, ‘या’ नेत्याने तुतारी फुंकली

On: October 22, 2024 3:57 PM
Sharad Pawar letter to CM Eknath Shinde
---Advertisement---

Thane News | राज्यात निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. यानंतर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अशात अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. शरद पवारांच्या पक्षात इच्छुकांनी रांग लावली आहे. अशात आणखी एका नेत्याने शरद पवार गटात प्रवेश केलाय. मुरबाडमध्ये एकनाथ शिंदे यांचा सुपाडा साफ झाल्याचं समोर आलं आहे.

शिंदे गटाला धक्का

शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख तसेच ठाणे (Thane News) जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी तुतारी फुंकली आहे. त्यामुळे भाजपचे आमदार किसान कथोरे यांच्या समोर अडचणी वाढणार आहेत.

रविवारी भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर, आमदार किसन कथोरे यांना येथून उमेदवारी जाहिर करण्यात आली. मात्र, सुभाष पवार यांनी आपण निवडणूक तर लढणारच, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षात जाणार हे निश्चित मानलं जात होतं.

सुभाष पवार शरद पवार गटात

सोमवारी (21 ऑक्टोबर) रोजी सुभाष पवार (Thane News) यांनी आपल्या पक्षाला राम राम ठोकला खरा मात्र, त्यांनी शरद पवार राष्ट्रवादी पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि माजी आमदार गोटिराम पवार यांच्या उपस्थितीत सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी प्रकाश पवार, धनाजी दळवी, रामभाऊ दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता भावर्थे हे देखील शरद पवार गटात आले आहेत. दरम्यान, या प्रवेशासोबतच सुभाष पवार यांना पक्षातर्फे उमेदवारीही मिळाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता किसन कथोरे विरूद्ध सुभाष पवार असा सामना होणार आहे.

News Title :  thane news subash pawar entered ncp sharadchandra pawar group

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपच्या कट्टर नेत्यानी साथ सोडली! शिवसेनेत प्रवेश करणार

सूरज चव्हाणचा पहिलाच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, कोर्टात खेचणार असल्याचा इशारा!

फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी जबरदस्त SUV लाँच; जाणून घ्या फीचर्स व किंमत

महाराष्ट्रातील ‘या’ जागांवर होणार कांटे की टक्कर, पाहा कुणाचं पारडं भारी?

कट्टर समर्थकाचा अजित पवारांना मोक्याच्या वेळी धक्का, पुण्यात मोठी उलथापालथ?

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now