Today Gold Silver Rate | आठवड्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या किंमत घसरणीचा ट्रेंड आजही कायम असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर 1,23,000 रुपयांवर घसरले आहेत तर चांदीचे दर 1 किलोसाठी 1,53,300 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. (Today Gold Silver Rate)
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या आणि चांदीच्या किंमतींमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. उच्चांकी दर गाठल्यानंतर आता दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात गडगडाट झाल्याचं चित्र आहे. यामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांमध्येही ‘आता खरेदी करावी का?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण :
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोमवारी सोन्याच्या डिसेंबर फ्युचर्समध्ये तब्बल 1448 रुपयांची घसरण झाली. सकाळी ट्रेडिंग दरम्यान सोनं 1,22,743 रुपयांवर घसरलं. गेल्या ट्रेडिंग सत्रात हा दर 1,24,191 रुपये होता.
यापूर्वी सोन्याच्या दराने या वर्षी 1,31,699 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र आता त्यात सतत घट होताना दिसत आहे.
चांदीच्याही भावात घट नोंदवण्यात आली आहे. डिसेंबर चांदी फ्युचर्समध्ये 238 रुपयांची घसरण नोंदवली गेली असून नवीन दर 1,53,913 रुपये किलो इतका झाला आहे. यापूर्वी हा दर 1,54,151 रुपये होता. वर्षभरात चांदीने 1,69,200 रुपयांचा सर्वोच्च दर गाठला होता.
Today Gold Silver Rate | आंतरराष्ट्रीय बाजारातही दर पडले :
कॉमेक्सवर सोनं पूर्वी 4069.20 डॉलर प्रति औंसवर ट्रेड होत होतं. मात्र आता ते घसरुन 4044.40 डॉलर प्रति औंसवर आले आहे. जागतिक पातळीवर सोन्याचा दर 4398 डॉलर प्रति औंस इतका उच्चांक गाठला होता. (Today Gold Silver Rate)
कॉमेक्सवर चांदीदेखील पडली असून तिचा किंमत दर 49.85 डॉलर प्रति औंस झाला आहे. काही दिवसांपूर्वीच चांदीने 53.76 डॉलर प्रति औंस इतका टप्पा गाठला होता.






