ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ भागातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

On: May 1, 2025 8:41 AM
Thane Water Cut
---Advertisement---

Thane Water Cut | ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. महापालिकेने जाहीर केले आहे की शहरातील काही भागात 1 आणि 2 मे रोजी दोन दिवस पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. त्यानंतर दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळणार असल्याने नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Thane Water Cut)

1 आणि 2 मे रोजी पाणीपुरवठा बंद 

ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्टेम प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि देखभाल कामांमुळे काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

आज 1 मे 2025 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकूम, ब्रम्हांड, पवार नगर, कोठारी कंपाउंड, डोंगरीपाडा आणि वाघबीळ या भागांना पाणीपुरवठा होणार नाही.

तर 2 मे रात्री 9 ते 3 मे सकाळी 9 वाजेपर्यंत, समता नगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि मुंब्रा येथील काही भागांमध्ये पाणी बंद राहील.

पाणीकपात मागील कारण-

या पाणी कपातीचे कारण म्हणजे पाणीपुरवठा योजनेतील दैनंदिन देखभाल व जलमापक (Flow Meter) बसवण्याचे काम आहे. हे काम चेने भागात करण्यात येणार आहे. यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असून, नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी महापालिकेकडून सतर्कतेने काम केले जात आहे.

पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर पुढील दोन दिवस म्हणजेच 3 व 4 मे रोजीही पाणी कमी दाबाने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरणे आणि साठा करून ठेवणे आवश्यक आहे.

 Title : Thane Water Cut for 2 Days in Key Areas

 

Join WhatsApp Group

Join Now