Assembly Elections 2024 | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात आचारसंहिता देखील लागू झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. त्यात तिसरी आघाडी देखील मैदानात उतरली आहे. महायुतीमधील भाजपकडून पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे मविआविरुद्ध महायुतीने पहिलं पाऊल टाकलं आहे. तर, मविआकडून अद्याप यादी जाहीर होणे बाकी आहे. कॉँग्रेस आणि ठाकरे गटात काही जागांवरून तिढा निर्माण झाल्याचं बोललं जातंय. हा वाद थेट दिल्ली हायकमांडपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे कॉँग्रेसकडून मविआत समन्वय साधण्याची जबाबदारी आता बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली आहे. (Assembly Elections 2024 )
महाविकास आघाडी vs महायुती
महाविकास आघाडीकडून आज उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या दोन वर्षात दोन मोठी पक्ष फुटली. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना शिंदे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपविरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी ,उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि कॉँग्रेस मैदानात आहे.
2019 चा विचार केल्यास आता राज्यात राजकीय गणिते खूप बदलली आहे. पक्षफूटीमुळे एकाच जागेवर अनेक जण इच्छुक असल्याने दोन्ही आघाडीत नाराजी शमविण्याचं मोठं आव्हान असणार आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. त्यामुळे मविआ नेत्यांचा विश्वास वाढला आहे. तर, दुसरीकडे महायुती आता सावध पाऊस घेऊनच पुढे जात आहे. 2019 च्या निवडणुकीत वंचित फॅक्टरमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला अनेक जागांवर फटका बसला होता. या निवडणुकीमध्येही प्रत्येक मतांसाठी दोन्ही आघाड्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. 2019 च्या निकालात तब्बल 37 जागा अशा होत्या, जिथे उमेदवाराच्या जय-पराजयाचं गणित अवघ्या 500 ते 5 हजार मतांनी ठरलं गेलं. (Assembly Elections 2024 )
‘या’ जागांवर होणार अटी-तटीची लढत
कॉँग्रेस : अक्कलकुवा मतदारसंघात कॉँग्रेस 2096 मतांनी विजयी झाली. येथे ॲड. के.सी.पाडवी कॉँग्रेसकडून उभे होते. त्यांचा येथे 82,770 मतांनी विजय झाला. तर, रिसोडमध्ये 2141, राजुरात 2501 तर नांदेड दक्षिणमध्ये 3592 मतांनी काँग्रेस विजयी ठरली.
शिवसेना : शिवसेनेने जवळपास 5 हजारांच्या आतल्या फरकानं 4 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेचे उमेदवार चांदिवलीत फक्त 409 मतांनी, सांगोल्यात 768 च्या फरकानं, पाचोऱ्यात 2084 आणि कलिनात 4931 मतांनी विजयी झाले.
राष्ट्रवादी : इंदापुरात राष्ट्रवादीचा फक्त 3110 मतांनी विजय झाला होता. वडगाव शेरीत 4975 मतांनी, कोपरगावात 822 मतांनी. बीडमध्ये 1984 च्या फरकानं राष्ट्रवादी विजयी झाली. चंदगडात 4385 मतांनी, घनसावंगीत 3409 मतांनी, सिन्नरमध्ये 2072 मतांनी आणि मोरगावात फक्त 718 मतांनी राष्ट्रवादीने विजय खेचून आणला. (Assembly Elections 2024 )
भाजप : 2019 च्या निवडणुकीत भाजपचे माळशिरसमध्ये 2590 मतांनी, पुणे कँन्टोमेंटमध्ये 5012 , दौंडमध्ये 746, उल्हासनगरात 2004, मूर्तीजापुरात 1910, माण-खटावमध्ये 3043, श्रीगोंद्यात 4750, खडकवासल्यात 2595, जिंतूरमध्ये 3717, चाळिसगावात 4287, अकोला पश्चिममध्ये 2593, नागपूर दक्षिणेत 4013, नागपूर मध्यमध्ये 4008, यवतमाळमध्ये 2253, अर्णीत 3153 आणि शिवाजीनगरात 5124 मतांनी उमेदवार विजयी ठरले होते. त्यामुळे या निवडणुकीत देखील निकालाचं गणित रंजक ठरण्याची चिन्ह दिसून येत आहेत. (Assembly Elections 2024 )
News Title : Assembly Elections 2024 Maharashtra
महत्वाच्या बातम्या –
ठाकरेंचे 53 शिलेदार ठरले?, पाहा कुणाला मिळालं तिकीट तर कुणाचा पत्ता कट?
पुणेकरांसाठी सर्वात महत्वाची बातमी! आता यापुढे रोज रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत…
दहावीच्या परीक्षेत मोठा बदल, आता ‘या’ विषयात 20 गुण मिळाले तरी विद्यार्थी होणार पास
ये रिश्ता क्या केहलाता है?, रात्री 12च्या ठोक्याला दिलेल्या शुभेच्छांची खमंग चर्चा!
पुण्यात सापडलेलं 5 कोटी घबाड कुणाचं?; संजय राऊत म्हणाले,’काय झाडी..काय डोंगर’






