टेस्ला भारतात येणार! ‘या’ ठिकाणी सुरू होणार शोरूम

On: February 20, 2025 4:04 PM
Tesla
---Advertisement---

Tesla l टेस्लाच्या (Tesla) कार त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे जगभरातील कारप्रेमींमध्ये लोकप्रिय आहेत. भारतातही या कारची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा आहे. आता टेस्लाच्या कार लवकरच भारतीय रस्त्यांवर धावताना दिसू शकतात.

एप्रिलपर्यंत भारतात उद्योग सुरू करण्याची योजना :

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) एप्रिलपर्यंत भारतात आपला रिटेल उद्योग सुरू करण्याची योजना आखत आहेत. टेस्ला सुरुवातीला बर्लिन प्लांटमधून (Berlin Plant) इलेक्ट्रिक कार (Electric car) आयात करण्याचा विचार करत आहे.

Tesla l मुंबई आणि दिल्लीत शोरूम :

टेस्लाने भारतातील आपल्या शोरूमसाठी जागा निश्चित केली आहे. मुंबईतील बीकेसी बिझनेस डिस्ट्रिक्ट (BKC Business District) आणि नवी दिल्लीतील एरोसिटीमध्ये (Aerocity) शोरूम उघडण्याची योजना आहे. कंपनी सुरुवातीला भारतीय बाजारपेठेत २५,००० अमेरिकन डॉलर्सपेक्षा (सुमारे २२ लाख रुपये) कमी किमतीत इलेक्ट्रिक कार लाँच करू शकते.

उत्पादनाबाबत अद्याप घोषणा नाही :

टेस्लाने भारतीय बाजारपेठेत कार उत्पादनाबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, कंपनी भारतीय OEM पुरवठादारांकडून सुटे भाग खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. २०२५ च्या अखेरपर्यंत टेस्ला भारतीय पुरवठादारांकडून १ अब्ज डॉलर्सपेक्षा (जवळपास ८,३०० कोटी रुपये) अधिकचे सोर्सिंग करू शकते, असा दावा करण्यात आला आहे.

इलॉन मस्क भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता

या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत इलॉन मस्कदेखील येऊ शकतात, असा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, टेस्लाने भारतात नोकरभरती सुरू केली आहे. लिंक्डइनवर (LinkedIn) १३ नोकऱ्यांसाठी जाहिरात देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि इलॉन मस्क यांच्यात झालेल्या भेटीनंतर या घडामोडी घडत आहेत.

News Title: Tesla Cars Coming to India Soon; Showrooms to Open in Mumbai-Delhi

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now