“त्याला दोष…”; घटस्फोटावर तेजश्री प्रधान पहिल्यांदाच बोलली

On: January 27, 2025 10:22 AM
Tejashree Pradhan Opens Up About Divorce and Moving On
---Advertisement---

Tejashree Pradhan | अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) ही ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. मात्र, तेजश्रीने काही दिवसांआधी या मालिकेला रामराम ठोकला. मालिका सोडल्यानंतर तेजश्रीने थेट श्रीश्री रविशंकर (Sri Sri Ravishankar) यांचे बंगळुरू येथील आश्रम गाठले. काही दिवस तिथे राहिल्यानंतर तेजश्री पुन्हा तिच्या कामात सक्रिय झाली आहे. तेजश्रीच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच (Professional Life) तिचे खासगी आयुष्य (Personal Life) देखील नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच एका मुलाखतीत तेजश्रीने घटस्फोटानंतर (After Divorce) समाजाच्या प्रश्नांना कशी सामोरी गेली याबद्दल सांगितले.

तेजश्रीच्या वैवाहिक आयुष्यात अनेक चढउतार आले. घटस्फोटानंतर तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. याविषयी तिने एका मुलाखतीत सविस्तरपणे सांगितले आहे.

‘दोषारोप करण्यात अर्थ नाही’

एका मुलाखतीत तेजश्री प्रधान म्हणाली, “दोन चांगली माणसं प्रत्येक वेळी चांगले जीवनसाथी असतीलच असं नाही. आजकाल आपण या विषयांवर अगदी सहज बोलतो म्हणून मला सांगायला आवडेल की एक महत्त्वाची गोष्ट जी मी माझ्या बाबतीत केली ती म्हणजे माझ्या आयुष्यात जे घडलं त्यासाठी मी त्या माणसाला दोष देणार नाही.” तेजश्री (Tejashree Pradhan)पुढे म्हणाली, “मला काहीतरी महान बोलायचंय म्हणून नाही तर माणूस म्हणून सांगते की ज्याने आपल्याला दुखावलंय किंवा जो व्यक्ती माझ्यामुळे दुखावलाय तर या दोन माणसांमध्ये आपण त्या माणसाला इतकं महत्त्व द्यायचंच नाही की आपल्या आयुष्यात एवढी मोठी गोष्ट त्याच्यामुळे झालीये.”

ती म्हणते, “आपल्याला दुखावणाऱ्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यात इतके महत्त्व का द्यावे? जे घडले ते माझ्या नशिबात होते आणि ते कुणाला दोष देऊन बदलणार नाही.”

‘हे माझं आयुष्य आहे आणि मोलाचं आहे’

“जे झालंय ते माझ्या नशिबात होतं, ते होणार होतंच. त्यासाठी मी दुसऱ्याला दोष देऊन त्या माणसाला मोठं करते. आज माझ्या आयुष्यात जे होतंय त्यासाठी मी समोरच्याला का जबाबदार धरू? हे माझं आयुष्य आहे आणि मोलाचं आहे”, असेही तेजश्री प्रधान म्हणाली. तेजश्रीच्या या विचारातून तिची प्रगल्भता दिसून येते. ती म्हणते, “माझ्या आयुष्यासाठी मी दुसऱ्याला जबाबदार का धरु? हे माझे आयुष्य आहे आणि ते मोलाचे आहे.”

दरम्यान, तेजश्रीच्या (Tejashree Pradhan)वर्कफ्रंट (Workfront) विषयी बोलायचे झाल्यास, ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका करत असताना तेजश्रीचा ‘हॅशटॅग तदेव लग्न’ (#TadevLagna) हा सिनेमा देखील रिलीज झाला होता. अभिनेता सुबोध भावेबरोबर (Subodh Bhave) तिने प्रमुख भूमिका साकारली होती. तेजश्रीने ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सोडल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तेजश्री आता पुन्हा कोणत्या कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Title: Tejashree Pradhan Opens Up About Divorce and Moving On

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now