Tata Capital | भारतीय शेअर बाजारात सध्या अस्थिरतेचं वातावरण असतानाच टाटा ग्रुपकडून (Tata Group) गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी घेऊन येण्यात आली आहे. टाटा कॅपिटल (Tata Capital) या आर्थिक सेवा देणाऱ्या कंपनीने तब्बल 15,000 कोटी रुपयांचा मेगा IPO आणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने यासाठी सेबीकडे (SEBI) गुप्त फायलिंग केली असून, यामुळे बाजारात उत्सुकता वाढली आहे.
बोर्डाची मंजुरी, नवीन शेअर्स आणि टाटा सन्सचा हिस्सा विक्रीसाठी
टाटा कॅपिटलच्या IPO ला कंपनीच्या संचालक मंडळाची मंजुरी मिळाली असून, यामध्ये 2.3 कोटी नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत. यासोबतच टाटा सन्स (Tata Sons) आपल्या हिस्सा विकणार आहे. सध्या टाटा सन्सकडे टाटा कॅपिटलमध्ये 93% हिस्सा आहे.
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, टाटा कॅपिटल आणि टाटा सन्स यांना सप्टेंबर 2025 पर्यंत शेअर बाजारात लिस्ट होणं बंधनकारक आहे. याचाच भाग म्हणून कंपनीने IPO आणण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा कॅपिटल ही एक गैर-बँकींग वित्तीय कंपनी (NBFC) असून, ती टाटा सन्सची सहाय्यक संस्था आहे.
शानदार आर्थिक कामगिरी, गुंतवणुकीसाठी परिपूर्ण संधी
वित्तीय वर्ष 2024 मध्ये टाटा कॅपिटलने 18,178 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, जो मागील वर्षाच्या तुलनेत 34% जास्त आहे. कंपनीचं लोन बुक देखील 40% नी वाढून एक लाख कोटींच्या पुढे गेलं आहे. त्याचबरोबर नफा देखील 3,150 कोटी रुपयांवर पोहोचला, ज्यामध्ये सहामाहीत 21% वाढ झाली आहे.
कंपनीच्या या घसघशीत कामगिरीमुळे IPO साठी मोठी मागणी निर्माण होण्याची शक्यता असून, गुंतवणूकदारांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.
Title: Tata Capital’s ₹15,000 Cr IPO: Big Investment Chance






