68 लाख रुपये अन् बँकॉकची वारी, तानाजी सावंतांनी लेकाचं विमान माघारी फिरवलं, नेमकं काय घडलं?

On: February 11, 2025 2:33 PM
Tanaji Sawant Son
---Advertisement---

Tanaji Sawant | शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे कथित अपहरण सोमवारी चर्चेचा विषय ठरले. त्याचे चार्टर्ड विमान बँकॉकला जाण्यासाठी पुणे पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे थांबवण्यात आले. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना फोन करून या प्रकरणी तातडीने कारवाई केली.

पुणे पोलिसांची तत्परता :

सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा अचानक घरातून बाहेर पडला आणि बँकॉकला जाण्यासाठी चार्टर्ड विमानाने उडण्यास निघाला. तानाजी सावंत यांनी पुणे पोलिसांना तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. वाऱ्याच्या वेगाने पुणे पोलिसांनी तपास सुरू केला आणि अवघ्या चार तासांत विमान आणि ऋषीराज सावंत दोघांनाही पुण्यात लँड करण्यात आलं.

Tanaji Sawant l राजकीय दबाव : 

तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आपल्या मुलाला बँकॉकला जाऊ न देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय हवाई उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना फोन करून तातडीने विमान माघारी वळवून घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावेळी तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज पुण्यातील लोहगाव विमानतळावर जाण्यासाठी बाहेर पडला होता, हे त्यांच्या कार चालकाने तानाजी सावंत यांना कळवले.

ऋषीराज सावंत याने घरातून बाहेर पडल्यावर त्याच्या घरच्यांनी चिंता व्यक्त केली आणि तानाजी सावंत यांनी यावर तातडीने कारवाई केली. शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी पोलिसांना दबाव आणून एकाच वेळी विमान कंपनीला विमान चेन्नईमध्ये उतरवून घ्यायला भाग पाडले. यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यतत्परतेची राज्यात चर्चा आहे.

ऋषीराज सावंत यांचे बँकॉकला जाण्यासाठी चार्टर्ड विमानाचे 68 लाख रुपये ऑनलाईन भरल्याची माहिती समोर आली आहे. या तपासातून हे स्पष्ट झाले की, ऋषीराजने कोणाशीही न सांगता विमानतळावर जाण्याचा निर्णय घेतला होता, आणि त्याच्या अचानक निघाल्यामुळे तानाजी सावंत (Tanaji Sawant) आणि त्यांचे कुटुंबीय घाबरले होते.

ऋषीराज सावंत आणि त्यांचे दोन मित्र हे नेमके कोणत्या कारणासाठी बाहेर चालले होते? याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. ऋषीराज सावंत यांच्या बरोबरील व्यक्तींचीही चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तानाजी सावंत हे शिवसेनेचे मोठे नेते असून त्यांचा दबदबा पुणे आणि परिसरात खूप मोठा आहे. त्यांचा पूर्वीचा मंत्रिपदाचा अनुभव आणि आर्थिक साम्राज्य यामुळे ते महत्त्वाचे आणि प्रभावशाली नेते मानले जातात.

News title : tanaji-sawant-uses-political-influence-to-stop-son-from-leaving-for-bangkok

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now