Mumbai News | मराठी मनोरंजनसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री स्वाती देवल (Swati Deol) सध्या ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे. याआधी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या (Majhi Tuji Reshimgaath) मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली होती. अभिनयासोबतच समाजातील विविध मुद्द्यांवर तिच्या स्पष्ट मतांसाठीही ती ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने पालकत्वाच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना एक हृदयद्रावक प्रसंग सांगितला आहे.
स्वाती देवलने मांडला अनुभव
माध्यमातील वृत्तानुसार, आजकालच्या पालकांनी मुलांना खूपच मोकळीक दिली असून, त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी ‘नाही’ ऐकण्याची सवय राहिलेली नाही, असा मुद्दा तिने मांडला आहे. या संदर्भात तिने स्वतःच्या परिसरातील एक धक्कादायक प्रसंग सांगितला, ज्याने सर्वंचेच मन हेलावून टाकले आहे.
स्वाती म्हणाली, “आमच्या भागात एक मुलगा राहायचा, तो आठवीत शिकत होत. त्याने आई-वडिलांकडे सायकल मागितली होती. मात्र, काही कारणास्तव त्यांनी त्याला सायकल घेऊन देऊ शकत नाही, असं सांगितलंल होते. हा साधा वाटणारा प्रसंग इतका गंभीर वळण घेईल, याची कोणालाही कल्पना नव्हती. त्या मुलाने केवळ सायकल न मिळाल्याने टोकाचा निर्णय घेतला आणि आत्महत्या केली.”
मुलांना परिस्थिती समजावून सांगणं गरजेचं
स्वाती पुढे म्हणाली, “मुलांना परिस्थिती समजावून सांगणं खूप महत्त्वाचं आहे. पालकांला मुलांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करणं शक्य नाही. त्यामुळेच त्यांना नकार पचवण्याची सवय असली पाहिजे. त्यांना काही गोष्टी मिळू शकत नाहीत, हे स्वीकारायला शिकवलं पाहिजे. आजच्या मुलांना मनातलं सगळं मिळालंच पाहिजे, अशी मानसिकता झाली आहे. नकाराला सामोरं जाण्याची ताकद त्यांच्यात राहिलेली नाही.”
तिच्या या वक्तव्याला तिच्या पतीनेही पाठिंबा दिला आहे. “आजकाल कोणत्याही मुलाला, मुलीला नकार ऐकायचा नाही. त्यांना वाटतं की, त्यांनी जे मागितलं ते मिळायलाच पाहिजे. पण जीवना नेहमी आपल्या मनासारखं घडत नाही. हे पालकांनी मुलांना समजावून सांगणं आवश्यक आहे,” असं त्याने स्पष्ट केलं.
View this post on Instagram
पालकत्वातील बदल आणि समतोल साधण्याची गरज
आजच्या पालकांनी मुलांना भरभरून प्रेम द्यावं, पण त्याचबरोबर त्यांना परिस्थितीचा अचूक अंदाज घेण्याची शिकवणही द्यावी, असं स्वाती देवलचं मत आहे. मुलांनी रागावणं, चिडणं, रुसणं हे साहजिक आहे, पण त्यांना समजून घेऊन योग्य दिशेने मार्गदर्शन करणं ही पालकांची जबाबदारी आहे.






