‘दत्ता गाडे वारंवार पॉर्न व्हिडीओ…’ ; सायबर तपासातून धक्कादायक खुलासा

On: April 18, 2025 4:57 PM
Swargate Rape Case
---Advertisement---

Swargate News | स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा झाला असून, आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याच्या विरोधातील तपासाचा समरी अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये आरोपीच्या खोट्या दाव्यांचा आणि गुन्ह्यातील सखोल तपशीलांचा उलगडा झाला आहे. आरोपीला अटक होईपर्यंत त्याने तपास चुकवण्याचे अनेक प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोषारोपपत्रातील गंभीर माहितीचा पर्दाफाश-

स्वारगेट (Swargate News) बस स्थानकात २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पीडिता फलटणला जाण्यासाठी बसस्टँडवर थांबलेली असताना, आरोपीने तिला फसवून शिवशाही बसमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. बस क्रमांक MH06 BW 0319 होती. या घटनेनंतर तात्काळ गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.

या प्रकरणात पीडितेची ससून हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिच्या कपड्यांचे आणि अन्य नमुन्यांचे रिपोर्ट पुण्यातील रासायनिक प्रयोगशाळेतून प्राप्त झाले. घटनास्थळावर आढळलेल्या केस आणि आरोपीच्या शर्टचे बटण यांचा तपासही प्रयोगशाळेत करण्यात आला. त्या बटणावरून आरोपीची ओळख निश्चित झाली. बसच्या दोन्ही बाजूला इतर दोन गाड्या असल्याने आणि दरवाजे बंद असल्याने पीडितेचा आवाज बाहेर गेला नाही, असे ध्वनीविश्लेषकांनी स्पष्ट केले आहे.

दत्तात्रय गाडेचे खोटे दावे –

तपासादरम्यान आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याने तो लैंगिकदृष्ट्या अक्षम असल्याचा दावा केला होता. मात्र ससून रुग्णालयातील तीन तज्ञ डॉक्टरांच्या टीमने तो पूर्णतः चुकीचा (Swargate News) असल्याचे निष्कर्ष दिले. तसेच आरोपीने गुन्ह्यानंतर गुनाट (Gunat) गावातील ऊसाच्या शेतात लपून राहून पोलिसांना चकवा दिला. मात्र डॉग स्क्वॉड, ड्रोन कॅमेरे आणि स्थानिकांच्या मदतीने तो २८ फेब्रुवारी रोजी पकडण्यात आला.

गुन्ह्यादरम्यान आरोपीचे लोकेशन घटनास्थळी असल्याचे मोबाईल तपासणीतून समोर आले. आरोपीच्या जीमेल सर्च हिस्ट्रीचा पंचनामा करण्यात आला असून, तो वारंवार पॉर्न व्हिडीओ पाहत असल्याचे सायबर तपासात आढळून आले. पीडितेच्या मदतीच्या ओरडांबाबत साउंड इंजिनियरकडून तपास करून तिचा आवाज बाहेर जाण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले. पीडितेने ओळख परेडमध्ये आरोपीची स्पष्ट ओळख पटवली. एकूण ८२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले असून, आरोपीने पीडितेवर जबरदस्ती केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

News Title – swargate news Truth Behind Gade Lies

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now