पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप! पक्षांतर्गत उलथापालथ अन् मोठ्या नेत्यांवर थेट कारवाई

On: August 4, 2026 5:35 PM
Sharad Pawar
---Advertisement---

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनेत महत्त्वाचा बदल करत सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून, पुढील आदेश येईपर्यंत केवळ दोनच नेते पक्षाची अधिकृत भूमिका मांडणार आहेत. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द :

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाबाबत अनेक राजकीय चर्चा सुरू आहेत. पक्ष भविष्यात एनडीए (NDA) मध्ये सहभागी होऊ शकतो, अशा चर्चांना उधाण आले असले तरी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी या शक्यतेचा स्पष्ट नकार केला आहे. आम्ही एनडीएमध्ये जाणार नसल्याची भूमिका अनेक नेत्यांनी मांडली आहे. मात्र, याच काळात पक्षांतर्गत काही महत्त्वाच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतानाच पक्षाने अचानक संघटनात्मक निर्णय जाहीर केला.

या निर्णयानुसार पक्षातील सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आल्या आहेत. पक्षाने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, यापुढे केवळ माजी आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) आणि महेश तपासे (Mahesh Tapase) हेच प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील. या संदर्भातील माहिती पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर करण्यात आली असून, इतर सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या पुढील आदेशापर्यंत रद्द असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Sharad Pawar | आदेशात नेमके काय नमूद? :

पक्षाच्या अधिकृत ट्विटर (X) हँडलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रावर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांची स्वाक्षरी आहे. त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, ४ ऑगस्ट २०२६ पासून यापूर्वी प्रवक्तापदासाठी करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या पुढील आदेश येईपर्यंत तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहेत. तसेच या कालावधीत विद्या चव्हाण आणि महेश तपासे हेच पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडतील. संबंधित सर्वांनी या आदेशाची नोंद घ्यावी, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयानंतर पक्षाने इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यामागे नेमके कारण काय आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. इतर प्रवक्त्यांना पदमुक्त करण्यामागील भूमिका काय आहे, तसेच आगामी काळात पक्षात आणखी कोणते संघटनात्मक किंवा राजकीय बदल होणार आहेत, याबाबतही विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतेही अतिरिक्त स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

News Title: NCP Cancels All Spokesperson Posts

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now