स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचा नवा खुलासा!

On: March 27, 2025 5:58 PM
Swargate Rape Case Villager Ganesh Gavhane Key Role in Arrest
---Advertisement---

Dattatray Gade | पुणे (Pune) शहरातील स्वारगेट (Swargate) एसटी आगारात एका २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणात आता नवीन धक्कादायक माहिती समोर आली असून, पीडित तरुणीने तपास यंत्रणेवर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याने केलेल्या या कृत्याबाबत आणखी तपशील उघडकीस आले आहेत.

पीडितेचा नवा खुलासा

मूळ घटनेनुसार, फलटणला (Phaltan) गावी जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आलेल्या पीडित परिचारिकेशी आरोपी दत्तात्रय गाडे याने संपर्क साधला आणि तिला शिवशाही बसमध्ये (Shivshahi bus) नेऊन तिच्यावर बलात्कार केला. वैद्यकीय तपासणी अहवालातून आरोपीने पीडितेवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. आता, सुमारे महिनाभरानंतर, पीडितेने राज्याच्या प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्रातून आणखी एक हादरवणारी माहिती दिली आहे.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय गाडे याने तिच्यावर दोन वेळा बलात्कार केल्यानंतर तिसऱ्यांदा अनैसर्गिक पद्धतीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने पूर्ण ताकदीनिशी विरोध केल्यामुळे आरोपी पळून गेला. हा खुलासा पीडितेने स्वतः केला असून, यामुळे प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे. पीडितेने आपल्या पत्रात या तिसऱ्या प्रयत्नाचा स्पष्ट उल्लेख केला आहे.

Dattatray Gade | पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आरोप

या प्रकरणातील पीडित तरुणीने केवळ आरोपीवरच नव्हे, तर पुणे पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी तिला अत्याचाराचे वर्णन करण्यास भाग पाडले, असा दावा तिने केला आहे. तसेच, पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची इच्छा नसताना आणि केवळ नाईलाजाने संमती मिळवून वैद्यकीय तपासणी केली, असा आरोपही पीडितेने पत्राद्वारे केला आहे. यामुळे तपास प्रक्रियेतील संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याशिवाय, पीडितेने या खटल्यासाठी ॲड. असीम सरोदे (Asim Sarode) यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, पुणे पोलिसांनी परस्पर ॲड. अजय मिसार (Ajay Misar) यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याचा आरोपही तिने केला आहे. दरम्यान, आरोपी दत्तात्रय गाडे याच्या न्यायालयीन कोठडीत ८ एप्रिल २०२५ पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याचे वकील वाजेद खान-बिडकर (Wajed Khan-Bidkar) यांनी त्याला कारागृहात भेटण्याची परवानगी मागितली आहे. पुणे पोलिसांनी आता या खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यासाठी गृह विभागाकडे (Home Department) विनंती केली आहे.

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now