Swara Bhaskar | अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar ) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. नागपूरमध्ये ‘छावा’ सिनेमावरून निर्माण झालेल्या गोंधळानंतर तिच्या नावाने व्हायरल होत असलेल्या दोन ट्विट्समुळे वाद उद्भवला आहे. मात्र, अभिनेत्रीने हे ट्विट्स फेक असल्याचा दावा करत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
‘ते’ ट्वीट व्हायरल
सोशल मीडियावर स्वरा भास्करच्या नावाने दोन ट्विट्स मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहेत. पहिल्या ट्विटमध्ये ‘छावा’ हा सिनेमा वादग्रस्त असल्याचे सांगून, नागपूरमध्ये निर्माण झालेल्या तणावाला विकी कौशल (Vicky Kaushal) आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) जबाबदार असल्याचे म्हटले गेले. तसेच, या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी देखील करण्यात आली.
दुसऱ्या ट्विटमध्ये ‘कामरा याचा शो एक कॉमेडी शो आहे. झालेल्या तोडफोडीसाठी शिंदे कार्यकर्ते जबाबदार आहे…’ असं म्हटलं गेलं. या पोस्ट्समुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, अभिनेत्रीवर टीकास्त्र डागले जात आहे.
स्वराची स्पष्टोक्ती: “हे ट्विट्स माझे नाहीत, फेक आहेत!”
या प्रकरणावर स्वतः स्वरा भास्करने प्रतिक्रिया दिली असून, हे ट्विट्स फेक असल्याचं तिने ठामपणे सांगितलं आहे. तिच्या म्हणण्यानुसार, उजव्या विचारसरणीच्या लोकांनी तिच्या नावाने चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. तिने या फेक ट्विट्सचे स्क्रिनशॉट शेअर करत लिहिलं, “मुर्ख उजव्या विचारसरणीच्या लोकांनी पुन्हा आपलं नेहमीचं काम सुरु केलंय – फेक फोटो, मीम्स आणि बनावट ट्विट्स व्हायरल करणं.”
स्वराच्या या स्पष्टीकरणानंतर अनेकांनी सोशल मीडियावर फॅक्ट चेक करण्याचे आवाहन करत समर्थनही दर्शवलं. दरम्यान, काही नेटकऱ्यांनी मात्र तिला पुन्हा एकदा लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केल्याचं म्हणत टीका केली. (Swara Bhaskar )
Both these tweets being circulated by RW ecosystem are fake. Neither is tweeted by me. Pls check your facts everyone. @grok pic.twitter.com/dMEm0CWo05
— Swara Bhasker (@ReallySwara) March 25, 2025
दरम्यान, स्वरा भास्कर लवकरच ‘मिसेस फलानी’ (Mrs. Falani) या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप घोषित झालेली नाही.
Title : Swara Bhaskar Slams Fake Tweets Over ‘Chhava’ Row






