“चित्राबाई पॉर्न बघत असतील, आक्रस्थळी बाईने…”, अंधारेंचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

On: May 2, 2024 4:01 PM
Sushma Andhare
---Advertisement---

Sushma Andhare | राज्याच्या काही भागात लोकसभेची जय्यत तयारी सुरु असून लोकसभेचे उमेदवार प्राचारावर जोर देत आहेत. दरम्यान राज्याच्या राजकारणात एक नवा वाद समोर आला आहे. ज्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाने केलेल्या जाहिरातीवरुन आरोप केले आहेत. दरम्यान त्यांनी केलेल्या आरोपावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युतर दिलं आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

सुषमा अंधारे (Sushma Andhare) बोलत असताना म्हणाल्या की, भाजपच्या आक्रस्थळे बाईने काहीतर बोलण्याचा प्रयत्न केला आहे. आधी तीर मारायचा आणि नंतर वर्तुळ करायचं, अशी त्यांची सवय आहे. आधी नितेश राणे यांनी असाच प्रयत्न केला होता, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला.

पुढे त्या म्हणाल्या की, पॉर्न इंडस्ट्री आपल्याकडे नाही, चित्राबाई पॉर्न फिल्म बघत असतील, आधी आपल्या पक्षाचा सल्ला घ्या. अर्धवट माहिती घेवून बोलायचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असं म्हणत चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवर सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ यांना ज्ञान-

सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या की, कोणत्याही राजकीय जाहिराती बनवताना आधी प्रोडक्शन हाऊसकडून रेकाॅर्ड चेक केलं जात असतं. यावर जाणारे प्रोग्राम सेन्सॉर केला जातो, भारत सरकारकडून सेन्सॉर होत असतात. माझं याचं ज्ञान कमी आहे, चित्रा वाघ यांचं पॉर्न व्हिडीओचं ज्ञान अगाध असावं किंवा त्या पारंगत असाव्यात, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्या प्रश्नाला प्रत्त्युत्तर दिलं आहे.

कंपनी कोणाची आहे?

एवढंच नाहीतर, त्यांनी जाहिरात करणाऱ्या कंपनीवर देखील निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, ज्या कंपनीने ही जाहिरात केली, ही कोणाची कंपनी आहे? त्याचा आणि या पॉर्न स्टारचा काय संबंध आहे? या जाहिरात कंपनीचे आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध आहेत? याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलं पाहिजे, याचा तपास व्हायला पाहिजे, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं.

News Title : Sushma Andhare on chitra wagh

महत्त्वाच्या बातम्या-

बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना नरेंद्र मोदी भावूक; म्हणाले…

‘तो जिवंत आहे’; सिद्धू मुसेवाला प्रकरणी पोलिसांचा खुलासा

‘पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती…’, चित्रा वाघ यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

‘आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही…; उद्धव ठाकरे संतापले

‘या’ तीन बँका करतील मालामाल; एका वर्षाच्या FD वर देतात तगडं व्याज

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now