‘सबसे बडा खिलाडी, सुरेशभाई कलमाडी’; पुण्यात ‘कलमाडी हाऊस’समोर कार्यकर्त्यांचा जल्लोष

On: April 29, 2025 3:42 PM
Suresh Kalmadi
---Advertisement---

Suresh Kalmadi | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रकुल स्पर्धा आयोजन समितीचे माजी प्रमुख सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांना दिल्ली न्यायालयाने (Delhi Court) मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. या निर्णयानंतर पुण्यातील (Pune) त्यांच्या समर्थकांनी एरंडवणे (Erandwane) येथील ‘कलमाडी हाऊस’ (Kalmadi House) समोर जमून मोठा जल्लोष साजरा केला. एकेकाळी राज्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या या घरासमोर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची गर्दी आणि घोषणाबाजी पाहायला मिळाली.

दिल्ली न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय :

२०१० साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या (Commonwealth Games 2010) आयोजनातील कथित भ्रष्टाचार आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi), तत्कालीन सरचिटणीस ललित भानोत (Lalit Bhanot) आणि इतरांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED – Enforcement Directorate) गुन्हा दाखल केला होता. दोन महत्त्वाच्या करारांमधील गैरव्यवहाराचे आरोप त्यांच्यावर होते.

या प्रकरणी ईडीने (ED) दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट (Closure Report) दिल्लीतील विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल (Sanjiv Aggarwal) यांनी सोमवारी स्वीकारला. सीबीआयने (CBI) यापूर्वीच भ्रष्टाचाराचा खटला बंद केला होता, त्यानंतर आता ईडीच्या (ED) अहवालालाही न्यायालयाने मान्यता दिल्याने कलमाडींना (Kalmadi) मोठा दिलासा मिळाला आहे.

Suresh Kalmadi | पुण्यात कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव :

दिल्लीतून (Delhi) क्लीन चिट मिळाल्याचे वृत्त समजताच पुण्यातील (Pune) काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी कलमाडी हाऊसबाहेर (Kalmadi House) एकत्र येऊन आनंद साजरा केला. ‘सबसे बडा खिलाडी, सुरेशभाई कलमाडी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.

गेल्या पंधरा वर्षांपासून कलमाडींविरोधात (Kalmadi) कोणतेही पुरावे सरकारला सापडले नाहीत, असा दावा कार्यकर्त्यांनी केला. भाजप (BJP), अण्णा हजारे (Anna Hazare) आणि अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी खोटे आरोप करून त्यांना गोवले, ज्यामुळे पुणे एका चांगल्या नेतृत्वाला मुकले, असा आरोपही कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

सुरेश कलमाडी: एक राजकीय प्रवास :

सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांचा जन्म १ मे १९४४ रोजी झाला. सेंट व्हिन्सेंट हायस्कूल (St. Vincent’s High School) आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये (Fergusson College) शिक्षण घेतल्यानंतर ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (NDA – National Defence Academy) दाखल झाले. त्यांनी १९६४ ते १९७२ या काळात भारतीय हवाई दलात (Indian Air Force) सेवा बजावली. १९७८ मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि १९८२ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. ते सलग ३० वर्षे खासदार होते आणि पी. व्ही. नरसिंहराव (P. V. Narasimha Rao) यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वेमंत्री म्हणूनही काम पाहिले.

News title : Suresh Kalmadi Gets Clean Chit in CWG Case

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now