सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

On: August 18, 2023 3:36 PM
---Advertisement---

पुणे | राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) 52 दिवसांनंतर बारामतीत दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे, पवार कुटुंब नाही, असं सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विचारांचं अंतर निर्माण झालं आहे. यांच्यात पवार कुटुंबियांचा काही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार कुटुंब नाही. हा एक कौटुंबिक विषय नाही. हे वैयक्तिक मतभेद नाहीत तर वैचारिक आहे. यात गैर काही नाही, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज अंतर दिसत आहेत. पुढे काही होईल मी सांगू शकत नाही हे वैचारिक मतभेद आहेत मन भेद नाही, असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय.

राज्या सरकार मार्फत अनेक भागात शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सर्वसामान्य जनतेच्या पैशांमधून शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम केवळ व्यासपीठावरील नेत्यांना प्रमोट करण्याचा केविलवाणा प्रकार आहे. राज्य सरकारने नवीन जुमला सुरू केल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now