“अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर सरकारचं मोठे वाटोळं होईल”

On: August 18, 2023 10:11 AM
---Advertisement---

मुंबई | अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री झाले तर सरकारचं वाटोळं होईल, असं प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी म्हटलं आहे. ते गोंदियात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

शरद पवार (Sharad Pawar) भाजपाबरोबर गेले, तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री झाले, तर सरकारचं मोठं वाटोळं होईल. पण, एकनाथ शिंदेंच्या कामात कोणी आडवं येऊ नये, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

बच्चू कडू यांनी मंत्रिपदावर देखील भाष्य केलं. माझ्या छातीवर तलवार ठेवली तरी मी मंत्रिपद स्विकारणार नाही. तशी परिस्थिती आल्यास राजकुमार पटेल यांना आम्ही मंत्री करू, असं बच्चू कडू म्हणालेत.

आजपासून दिव्यांगाच्या दारी अभियान सुरु होणार आहे. संपूर्ण राज्यात फिरुन दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आम्ही दिव्यांगासाठी एक धोरण आखणार आहोत. 16 ॲाक्टोबरपर्यंत राज्यात फिरुन डिसेंबरपर्यंत धोरण तयार करणार आहोत, असं बच्चू कडू म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now