Sunita Williams l तब्बल नऊ महिन्यांनंतर भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स अखेर पृथ्वीवर परतणार आहेत. बोईंग स्टारलायनरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडांमुळे त्यांचा अंतराळातील मुक्काम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला. मात्र, NASA, SpaceX आणि अमेरिकी सरकारच्या अथक प्रयत्नांनंतर विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर मंगळवारी पृथ्वीवर परतण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मिशनची वेळ आणि परतीचे ठिकाण :
NASA च्या अधिकृत माहितीनुसार, सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी उद्या २१:५७ GMT (भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे ३:२७) फ्लोरिडाच्या समुद्रकिनाऱ्यावर यशस्वीरित्या लँडिंग करतील.
Watch the @SpaceX #Crew10 members enter the space station and join the Exp 72 crew for a long-duration space research mission. https://t.co/WHpxBz51Ts https://t.co/WHpxBz51Ts
— International Space Station (@Space_Station) March 16, 2025
मूळतः बुधवारी ही मोहिम पूर्ण होणार होती, मात्र हवामान बदलांमुळे एक दिवस आधीच म्हणजे मंगळवारी लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Sunita Williams l कोणत्या अंतराळवीरांसोबत असेल परतीचा प्रवास? :
या मोहिमेत स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलच्या मदतीने विलियम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतणार आहेत. त्यांच्यासोबत अमेरिकी अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बूनोव हे देखील पृथ्वीवर परततील.
.@NASA will provide live coverage of Crew-9’s return to Earth from the @Space_Station, beginning with @SpaceX Dragon hatch closure preparations at 10:45pm ET Monday, March 17.
Splashdown is slated for approximately 5:57pm Tuesday, March 18: https://t.co/yABLg20tKX pic.twitter.com/alujSplsHm
— NASA Commercial Crew (@Commercial_Crew) March 16, 2025
NASA तर्फे या संपूर्ण मोहिमेचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) करण्यात येणार आहे. संपूर्ण जग हा ऐतिहासिक क्षण लाईव्ह पाहू शकणार आहे.
पृथ्वीवर परतल्यानंतर विलियम्स आणि इतर अंतराळवीरांचे स्वास्थ्य तपासले जाईल, त्यांच्यावर वैद्यकीय चाचण्या होतील आणि त्यानंतर ते माध्यमांसमोर आपला अनुभव शेअर करतील. सुनीता विलियम्स या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीरांपैकी एक असल्यामुळे भारतासाठीही हा एक अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
News Title: Sunita Williams to Return to Earth on Tuesday – NASA to Broadcast the Historic Moment Live






