Sunetra Pawar Z Plus Security | महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आता ‘Z Plus’ दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना गृह विभागाला देण्यात आल्या असून, राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी खासदार असताना त्यांना ‘X’ दर्जाची सुरक्षा होती.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे तीन महत्त्वाची खाती सोपवण्यात आली असून मंत्रालयातील अजित पवार यांच्या वापरातील दालनेही त्यांच्या कार्यालयासाठी देण्यात आली आहेत. पुणे आणि बीड या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपदही त्यांच्याकडे देण्यात आले आहे. (Sunetra Pawar Z Plus Security)
सुरक्षेत वाढ का करण्यात आली? :
राज्य सरकारकडून सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काळात त्या अधिकृत कार्यक्रम, दौरे आणि बैठकींमध्ये सक्रिय राहणार असल्याने त्यांच्या सुरक्षेस विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढील आठवड्यात त्या अधिकृतपणे कार्यभार स्वीकारतील, अशी माहिती समोर येत आहे. (Maharashtra Politics)
X, Y, Z आणि Z Plus अशा सुरक्षेच्या विविध श्रेणी असून, संबंधित व्यक्तींच्या धोक्याच्या पातळीचा आढावा घेऊन सुरक्षा दर्जा ठरवला जातो. देशातील अतिमहत्त्वाच्या पदावरील व्यक्ती किंवा धोका असलेल्या नेत्यांना सरकारकडून उच्चस्तरीय सुरक्षा पुरवली जाते.
Sunetra Pawar Z Plus Security | Z Plus सुरक्षा म्हणजे काय? :
Z Plus सुरक्षा ही SPG नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च सुरक्षा व्यवस्था मानली जाते. ही सुरक्षा प्रामुख्याने व्हीव्हीआयपी, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा अत्यंत धोका असलेल्या व्यक्तींना दिली जाते. (Sunetra Pawar Z Plus Security)
या सुरक्षेमध्ये एक बुलेटप्रूफ वाहन, दोन एस्कॉर्ट गाड्या, अधिकारी आणि जवान मिळून 30 पेक्षा अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. संबंधित व्यक्ती कुठेही जाणार असतील, तर त्या ठिकाणची आधीच सुरक्षा तपासणी केली जाते आणि विशेष बंदोबस्त लावला जातो.






