‘विद्यार्थ्यांना ‘स्पेस आंत्रप्रेन्युअर’ होण्याची संधी’; डॉ. के. सिवन यांचं विद्यार्थ्यांना आवाहन

On: February 25, 2025 12:03 PM
Space Entrepreneurs
---Advertisement---

Space Entrepreneur l पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (Army Institute of Technology – AIT) 31 व्या स्थापना दिनानिमित्त, इस्रोचे (ISRO) माजी प्रमुख डॉ. के. सिवन यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना, त्यांनी अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्याच्या संधी असल्याचे सांगितले. पूर्वी, उपग्रह किंवा अवकाशयानांच्या निर्मितीसारखे उपक्रम केवळ भारतीय अवकाश संशोधन संस्थेद्वारे (इस्रो) केले जात होते, परंतु आता हे क्षेत्र खासगी उद्योगांसाठी खुले झाले आहे.

नवीन अवकाश धोरण आणि संधी :

केंद्र सरकारने नवीन अवकाश धोरण जाहीर केल्याने, शैक्षणिक संस्था व खासगी उद्योगही उपग्रहांची निर्मिती करू शकतात. अवकाश ॲप्लिकेशन्स (Applications) तयार करू शकतात. त्यामुळे अंतराळ क्षेत्रात तंत्रज्ञान विकास व उद्योजकतेच्या भरपूर संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Space Entrepreneur l डॉ. सिवन यांचे आवाहन :

डॉ. सिवन यांनी विद्यार्थ्यांना ‘स्पेस आंत्रप्रेन्युअर’ होऊन देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “अवकाश तंत्रज्ञान हे समाजातील प्रत्येक घटकाशी जोडलेले असून, वैद्यकीय असो वा बँकिंग (Banking), अनेक क्षेत्रांतील ॲप्लिकेशनमध्ये त्याचा वापर होतो.”

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी, 2025 हे वर्ष तंत्रज्ञान स्वीकाराचे वर्ष म्हणून ओळखले जाईल, असे सांगितले. तसेच, भारतीय लष्करात मोठे तांत्रिक परिवर्तन होत आहे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी AIT च्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence), क्वांटम कॉम्प्युटिंग (Quantum Computing), रोबोटिक्स (Robotics), बिग डेटा ॲनालिटिक्स (Big Data Analytics) व ऑगमेंटेड रिअॅलिटीसारख्या (Augmented Reality) तंत्रज्ञानात संशोधनावर भर देण्याचे आवाहन केले.

AIT चे संचालक ब्रिगेडियर अभय भट (निवृत्त) यांनी संस्थेच्या कार्याचा अहवाल सादर केला. ते म्हणाले की, “संस्थेत कम्प्युटर इंजिनीअरिंग विषयाचे पीएचडी (PhD) केंद्र सुरू केले जात आहे, तसेच संस्थेला स्वायत्त दर्जा मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे.”

News Title: Students Have Opportunity to Become ‘Space Entrepreneurs’: Dr. K. Sivan

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now