शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा!

On: January 28, 2025 3:01 PM
India-US Trade Deal
---Advertisement---

Share Market l शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक धोक्याचा इशारा आहे. पुढील महिन्यात, म्हणजे फेब्रुवारी २०२५ मध्ये, शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रसिद्ध ‘रिच डॅड पुअर डॅड’ (Rich Dad Poor Dad) या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) यांनी ही भीती व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, फेब्रुवारी २०२५ मध्ये शेअर बाजाराला इतिहासातील सर्वात मोठी घसरण सहन करावी लागू शकते.

मात्र, कियोसाकी यांनी असेही म्हटले आहे की, या आपत्तीचे काही लोक संधीत रूपांतर करू शकतात. घसरणीचा काळ हा सवलतीच्या दरात मौल्यवान वस्तू मिळविण्याची उत्तम संधी असते, असे ते म्हणतात. अशा वेळी, जे गुंतवणूकदार जलद आणि सावध निर्णय घेतील ते या घसरणीचा फायदा घेऊ शकतात.

२०१३ मध्येच दिला होता इशारा! :

रॉबर्ट कियोसाकी यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांनी २०१३ मध्ये लिहिलेल्या ‘रिच डॅड्स प्रोफेसी’ (Rich Dad’s Prophecy) या पुस्तकात या घसरणीबद्दलचा इशारा दिला होता. (Stock Market Forecast) “मी म्हणालो होतो की शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण येणे बाकी आहे आणि ती फेब्रुवारी २०२५ मध्ये होईल,” असे त्यांनी लिहिले आहे. गेल्या वर्षीच्या शेवटच्या महिन्यापासून शेअर बाजाराची वाटचाल संथ झाली आहे आणि अलीकडेच त्यात अनेक घसरणी नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामुळे कियोसाकी यांचे भाकीत खरे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कियोसाकी यांनी या संभाव्य मंदीच्या दुसऱ्या बाजूवरही प्रकाश टाकला. ते म्हणतात की इतिहासातील सर्वात मोठी घसरण अशा गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम संधी असेल ज्यांना सर्व काही सवलतीच्या दरात खरेदी करायचे आहे. “घसरणीच्या काळात सर्व काही विक्रीसाठी उपलब्ध होते,” असे ‘रिच डॅड पुअर डॅड’चे लेखक लिहितात.

Share Market l बिटकॉइनमध्ये वाढ होण्याची शक्यता :

कियोसाकी यांच्या मते, या घसरणीमुळे मोठ्या संख्येने लोक शेअर आणि बॉण्ड मार्केटमधून बाहेर पडून बिटकॉइनमध्ये (Bitcoin) गुंतवणूक करतील. त्यामुळे बिटकॉइनच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, शेअर बाजारातील घसरण गुंतवणूकदारांना सुरक्षित आणि अधिक फायदेशीर पर्यायांकडे वळवेल. (Stock Market Forecast)

अशा परिस्थितीत, बिटकॉइनमधील गुंतवणूक वाढेल आणि त्याची किंमतही वेगाने वाढेल. विशेष म्हणजे, अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा सत्तेत येण्याच्या शक्यतेने क्रिप्टोकरन्सीच्या (Cryptocurrency) किमतींमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच बिटकॉइनने विक्रमी उच्चांक गाठला आहे.

चांदीत गुंतवणूक करण्याचा सल्ला :

‘रिच डॅड पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी हे गुंतवणुकीबाबत सातत्याने सल्ले देत असतात. (Stock Market Forecast) काही काळापूर्वी, त्यांनी लोकांना चांदीमध्ये (Silver) गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. चांदी शक्य तितक्या लवकर खरेदी करावी कारण त्यात भविष्य आहे, असे ते म्हणाले होते. चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि हा वापर जसजसा वाढत जाईल तसतशी चांदीची किंमतही वाढेल, असा त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे चांदीमध्ये थोडीशी गुंतवणूकही फायदेशीर ठरू शकते, असे ते म्हणतात. भविष्यात चांदी मोठा नफा मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

News Title: Stock-Market-Crash-Prediction-February-2025-Robert-Kiyosaki-Rich-Dad-Poor-Dad

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now