बजेटनंतर शेअर बाजारात घसरण, मात्र काही शेअर्सनी केली कमाल!, तुमच्याजवळ आहेत का?

On: February 1, 2025 3:00 PM
Market Crash
---Advertisement---

Union Budget 2025 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणाली अंतर्गत 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर दायित्वाची मोठी घोषणा केली. मात्र, शेअर बाजाराला ही कर सवलत रुचलेली दिसत नाही. बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजारात घसरण झाली आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर विधेयकाची घोषणा केली असून ते पुढील आठवड्यापासून लागू होणार आहे.

शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. निफ्टी (Nifty) 51 अंकांनी घसरून 23,450 वर आला, तर सेन्सेक्स (Sensex) आज 100 पेक्षा जास्त अंकांनी घसरून 77,400 वर व्यवहार करत आहे. बजेट सादर झाल्यानंतर बाजारात विक्रीचा सपाटा दिसून आला.

सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण :

बाजारात दबाव असल्याने सरकारी कंपन्यांच्या (PSU) शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. RVNL मध्ये 6 टक्क्यांची घसरण झाली आहे. IRB मध्ये देखील 6 टक्क्यांची घसरण झाली आहे. मझगाव डॉक, BDL आणि NHPC सारखे शेअर्ससुद्धा घसरणीसह व्यवहार करत आहेत.

Union Budget 2025 l अदानी समूहाच्या शेअर्सची मिश्र कामगिरी :

शेअर बाजारात घसरण असताना अदानी समूहाच्या शेअर्समध्ये (Adani Group Stocks) मिश्र कल दिसून येत आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अदानी पॉवर आणि अदानी ग्रीन वगळता सर्व शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

BSE सेन्सेक्समधील टॉप 30 शेअर्सपैकी 13 शेअर्स वाढले आहेत, तर उर्वरित 17 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. यामध्ये झोमॅटोच्या शेअरमध्ये सर्वाधिक 7 टक्क्यांची तेजी आली आहे. तर L&T च्या शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे.

NSE च्या टॉप 50 शेअर्सपैकी ITC हॉटेल्स, महिंद्रा अँड महिंद्रा, BEL, अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तर NSE टॉप 50 शेअर्सपैकी 23 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत, ज्यामध्ये हिरोमोटोकॉर्प आणि विप्रो सारख्या शेअर्सचा समावेश आहे.

FMCG शेअर्सची कमाल :

शेअर बाजारात FMCG शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. झोमॅटोचे शेअर्स जवळपास 8 टक्क्यांनी वधारले आहेत. तर टाटा ट्रेंट, एव्हेन्यू डीमार्टचे शेअर्स 7 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत आणि गोदरेज कंझ्युमरचे शेअर्स 7 टक्क्यांपर्यंत वाढून व्यवहार करत आहेत.

कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक दबाव? :

IT वगळता आज सर्व निर्देशांकांमध्ये तेजी दिसून येत आहे. सर्वाधिक वाढ रिअल्टी क्षेत्रात झाली आहे, जे जवळपास 1 टक्क्यांनी वधारले आहे. यानंतर FMCG, बँकिंग आणि इतर क्षेत्रांमध्ये तेजी दिसून आली आहे.

News Title : Stock-Market-Budget-2025-PSU-Stocks-Fall-FMCG-Shares-Gain

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now