जिंकला स्टॅन पण लाॅटरी लागलीय प्रियंकाला; तिचा आनंद गगनात मावेना

On: February 13, 2023 4:32 PM
---Advertisement---

मुंबई | बिग बाॅस 16 चे(Bigg Boss 16) ग्रॅंड फिनाले रविवारी संध्याकाळी पार पडले. एमसी स्टॅन(MC Stan) हा या सीझनचा विजयी ठरला आहे. स्टॅन विजयी झाला असला तरी विनरची खरी मानकरी प्रियंका चहर चौधरी(Priyanka Chahar Choudhary) आहे, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

विनर ठरल्यानंतर स्टॅनला ३१ लाख रूपये आणि एक लक्झरी कार बक्षिस म्हणून मिळाली आहे. पण आता प्रियंकाला बिग बाॅसकडून मिळालेल्या गिफ्टचीसुद्धा जोरदार चर्चा होतेय.

प्रियंकाला एका मोठ्या चित्रपटाची ऑफर आली आहे. त्यामुळं तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ‘डंकी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. एवढंच नाही तर सलमान खाननेसुद्धा(Salman Khan) तिच्यासोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

दरम्यान, बिग बाॅस शो जेव्हा चालू होता तेव्हा कलर्स वाहिनीच्या स्पाॅन्सरनं एक ब्यूटी काॅन्टेस्ट ठेवली होती. यामध्ये बिग बाॅसमधील सर्व स्रियांनी भाग घेतला होता. यात प्रियंका विनर झाली होती. त्यावेळीही तिला २५ लाखांची रक्कम मिळाली होती. तसेच श्रद्धा कपूरसोबत(Shradha Kapoor) एका अॅडमध्ये काम करण्याची संधीही तिला मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now