वेड लावणार पुन्हा वेड; रितेश-जेनेलियाची मोठी घोषणा

On: February 13, 2023 3:47 PM
---Advertisement---

मुंबई | रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि जेनेलियाच्या(Genelia Dsouza) गतवर्षीच्या अखेरीस रिलीज झालेल्या ‘वेड'(Ved) या चित्रपटानं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीतही अनेक मराठी चित्रपटांचं रेकाॅर्ड तोडलं आहे.

रितेशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट होता तर जेनेलियाचा मराठी चित्रपटात मुख्य भूमिका असणारा वेड हा पहिला चित्रपट होता. रिअल लाईफमधील या जोडीच्या केमिस्ट्रीला मराठी प्रेक्षकांचीही भरपूर पसंती मिळाली आहे.

चित्रपट रिलीज होऊन आता कित्येक दिवसांचा कालावधी उलटला असला तरी वेडची क्रेझ कायम आहे. हे लक्षात घेता व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर रितेश-जेनेलियानं मोठी घोषणा केली आहे.

१३ ते १६ फेब्रुवारी दरम्यान वेड अत्यंत कमी किमतीत पाहता येणार आहे. या काळात संपूर्ण महाराष्ट्रात एकाच किंमतीत हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

त्यामुळं ज्यांनी कोणी वेड चित्रपट अजूनही पाहिला नाही त्यांच्यासाठी चित्रपट पाहण्याची ही सुवर्णसंधी आहे. तसेच व्हेलेंटाईन डे निमित्त कपललाही हा खऱ्या प्रेमाची शिकवण देणारा चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now