श्रीनगरहून येण्यासाठी तिकीटांचे दर तिप्पट; किंमत पाहून थक्क व्हाल

On: April 23, 2025 3:40 PM
Nanded Airport Flights
---Advertisement---

Srinagar Flight Ticket Hike l पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून आपल्या मायभूमीत परतण्यासाठी हजारो पर्यटक धाव घेत आहेत. मात्र, या संकटकाळात काही खासगी विमान कंपन्यांनी तिकीटांचे दर तिप्पट वाढवल्याने देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी श्रीनगर ते मुंबई तिकीट ₹५६,००० पर्यंत पोहोचल्याचे स्क्रीनशॉट शेअर करत निषेध नोंदवला आहे.

DGCA चे आदेश: रद्द व बदल शुल्क माफ करा, दर वाढवू नका :

नेटीझन्सच्या संतप्त प्रतिक्रियांनंतर DGCA (नागरी उड्डाण महासंचालनालय) सक्रिय झालं असून, 23 एप्रिल रोजी सर्व विमान कंपन्यांना निर्देश दिले आहेत की:

– तिकीट रद्द आणि बदलाचे शुल्क (cancellation/rescheduling charges) लावू नयेत
– प्रवाशांकडून अत्यधिक दर आकारू नयेत
– अधिक विमान उड्डाणांची व्यवस्था करावी

या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी एअर इंडिया व इंडिगोने 4 अतिरिक्त फ्लाइट्स सुरू केल्या आहेत.

Srinagar Flight Ticket Hike l “संकटात संधी” – नेटीझन्सचा संताप :

श्रीनगरमधील परिस्थितीमुळे नागरिक चिंतेत असताना, अनेक विमान कंपन्यांनी तिकीट दरात प्रचंड वाढ केली. मात्र अशा वागणुकीला नेटीझन्सने “संकटात संधी शोधणे” असे संबवत कडक शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान, या हल्ल्यानंतर हजारो पर्यटकांसोबतच अमरनाथ यात्रेसाठी आलेले भाविकही परतीच्या मार्गावर आहेत. यामुळे रेल्वे आणि विमानसेवा दोन्हीवर प्रचंड ताण आहे. DGCA ने सर्व विमान कंपन्यांना श्रीनगरहून इतर प्रमुख शहरांसाठी सेवा वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.

News Title: Srinagar Flight Ticket Prices Triple After Pahalgam Attack – DGCA Orders Airlines to Waive Charges

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now