Sonakshi Sinha | सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहिर इक्बाल (Zaheer Iqbal) यांच्या विवाहाला यंदा २३ जून रोजी एक वर्ष पूर्ण होणार आहे. विवाहानंतर पासूनच सोनाक्षी दुसऱ्या धर्मातील व्यक्तीसोबत विवाह केल्यामुळे अनेकदा ट्रोल झाली आहे. मात्र, अलीकडेच एका चाहत्याने घटस्फोटावर केलेल्या टीकेला सोनाक्षीने दिलेले प्रत्युत्तर सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे.
घटस्फोटाच्या चर्चांवर सोनाक्षीच प्रत्युत्तर-
सोनाक्षी आणि जहिर यांचं लग्न अजून एक वर्षही झालेलं नाही, तरीही सोशल मीडियावर काही युजर्स त्यांच्याबाबत नकारात्मक टिप्पणी करत आहेत. अशाच एका फॅनने कमेंट करत लिहिलं की, “तुमचा घटस्फोट लवकरच होणार आहे.” या त्रासदायक कमेंटला सोनाक्षीनेही चपखल उत्तर दिलं. तिने लिहिलं, “सर्वात आधी तुझ्या मम्मी पप्पांचा होईल, मग आमचा… वादा.” सोनाक्षीचा हा प्रत्युत्तर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
प्रत्युत्तरावर फॅन्स खुश, सोशल मीडियावर वाहवा-
सोनाक्षीचं (Sonakshi Sinha) हे प्रत्युत्तर जसं सोशल मीडियावर पोस्ट झालं, तसं अनेक चाहत्यांनी तिचं कौतुक केलं. एका युजरने लिहिलं, “आजकाल लोक कुणाचं सुख पाहू शकत नाहीत.” दुसऱ्याने म्हटलं, “सोनाक्षी आणि जहिर हे इंडस्ट्रीमधील सर्वात गोड जोडपं वाटतं.” तर तिसऱ्या युजरने प्रतिक्रिया दिली, “खरंच अफलातून उत्तर दिलंय.”

घराबाहेर नव्हे, घरातच केली होतं कोर्ट मॅरेज-
सोनाक्षी सिन्हाने आपल्या घरातच जहिर इक्बालसोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. या लग्नाला केवळ काही मोजके कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते. त्यानंतर सोनाक्षीने बॉलिवूडमधील सहकाऱ्यांसाठी एक भव्य रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. लग्नानंतर हे जोडपं सातत्याने सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे विनोदी आणि मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते, जे त्यांच्या फॅन्सना फारच आवडतात.






