Nothing Phone 3 लवकरच बाजारात, पहिली झलक आली समोर

On: January 27, 2025 12:01 PM
Smartphone Nothing Phone 3
---Advertisement---

Smartphone | आपल्या अनोख्या ट्रान्सपरंट डिझाईनसह (Transparent Design) स्मार्टफोन (Smartphone) देण्यासाठी प्रसिद्ध असलेली कंपनी नथिंग (Nothing) लवकरच बाजारात नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. हा फोन नथिंग फोन 3 (Nothing Phone 3) असेल, असे मानले जात आहे. आगामी फोनची टीजिंग (Teasing) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media Platform) सुरू झाली आहे.

नव्या फोनची पहिली झलक

यासह कंपनीने काही स्केचेस (Sketches) सादर केले आहेत, ज्यामध्ये फोनची एक झलक दिसत आहे. मात्र , स्मार्टफोनचे लाँच (Launch), किंमत (Price) आणि इतर तपशीलांबद्दल अद्याप अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही.

नथिंगने आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) (Twitter) अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये हातांनी तयार केलेली काही स्केचेस दिसत आहेत.

हे स्केचेस सूचित करतात की, डिव्हाइसमध्ये ट्रान्सपरंट बॅक पॅनल (Transparent Back Panel) दिले जाईल. तर, इतर इमेजेसमध्ये दोन सर्कल्स दिली आहेत.

ज्यामध्ये पिल-शेप कॅमेरा सेटअप (Pill-Shaped Camera Setup) आगामी फोनमध्ये उपलब्ध असेल, असे समजते. म्हणजेच, समान कॅमेरा सेटअप सध्या नथिंग फोन 2 (Nothing Phone 2) मध्ये उपलब्ध आहे.

कंपनीने शेअर केलेल्या स्केचेसवरून असे दिसते की, या फोनमध्येही पारदर्शक बॅक पॅनल असेल आणि कॅमेरा सेटअपमध्ये काहीसा बदल केला जाईल.

अधिकृत माहितीची प्रतीक्षा

नथिंग फोन 3 बद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लाँचची तारीख, किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्ससाठी (Specifications) आपल्याला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

Title : Smartphone Nothing Phone 3 Teased with Transparent Design First Look Revealed

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now