IMD Smart City List l ‘स्मार्ट सिटी’ म्हणजे केवळ चकचकीत इमारती नव्हेत, तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोपी झालेली जीवनशैली, सुरक्षितता, स्वच्छता आणि प्रभावी सार्वजनिक सेवा… अशा शहरांची यादी IMD (Institute for Management Development) या संस्थेने नुकतीच २०२४ साठी जाहीर केली आहे.
या ‘स्मार्ट सिटी इंडेक्स 2024’ मध्ये १४२ देशांतील शहरांचं मूल्यांकन करण्यात आलं असून, त्यामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभाव, नागरी सेवा, वाहतूक, सार्वजनिक व्यवस्थापन आणि नागरिकांच्या समाधानाचा स्तर पाहिला जातो.
टॉप 5 स्मार्ट सिटीज कोणत्या? :
झ्युरिक (Zurich), स्वित्झर्लंड – जागतिक क्रमांक 1
ओस्लो (Oslo), नॉर्वे – जागतिक क्रमांक 2
कॅनबेरा (Canberra), ऑस्ट्रेलिया – जागतिक क्रमांक 3
कोपेनहेगन (Copenhagen), डेन्मार्क – जागतिक क्रमांक 4
सिंगापूर (Singapore) – आशियातील एकमेव शहर टॉप 5 मध्ये
IMD Smart City List l भारतासाठी धक्कादायक स्थिती! :
भारत ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प राबवत असला तरी, या जागतिक यादीत भारताची स्थिती फारशी समाधानकारक नाही. केवळ चार शहरांनी यादीत स्थान मिळवलं असून, एकही शहर टॉप 100 मध्ये नाही.
IMD Smart City List l भारतातील रँकिंग:
दिल्ली – 106 वा क्रमांक
मुंबई – 107 वा क्रमांक
बंगळुरु – 109 वा क्रमांक
हैदराबाद – 111 वा क्रमांक
ही रँकिंग सरकार आणि स्थानिक प्रशासनासाठी एक स्पष्ट इशारा आहे – स्मार्ट सिटी म्हणजे केवळ नावाला नव्हे, तर खऱ्या अर्थाने तंत्रज्ञान, सुविधा आणि नागरिकांची समाधानी जीवनशैली यांचा समन्वय असलेली शहरी व्यवस्था!






