उन्हामुळे झालेलं टॅनिंग घालवा घरच्या घरी; ग्लो येईल काही दिवसांत

On: April 10, 2025 2:50 PM
Summer Skincare
---Advertisement---

Skincare Tips | उन्हाळ्याच्या दिवसात बदलत्या हवामानामुळे त्वचेवर ताण येतो. त्वचा कोरडी, तेलकट आणि निस्तेज दिसू लागते. त्यातच सतत उन्हाच्या संपर्कात आल्याने टॅनिंग, पिग्मेंटेशन आणि पिंपल्ससारख्या समस्या उद्भवतात. यासाठी अनेकजण महागड्या स्किन ट्रीटमेंटचा अवलंब करतात, पण त्याऐवजी घरीच एक नैसर्गिक फेसस्क्रब तयार करून त्वचा पूर्ववत करता येते.

बोटॉक्स ट्रीटमेंटऐवजी नैसर्गिक उपाय प्रभावी

उन्हाळ्यात अनेक महिला त्वचेसंबंधी तक्रारींवर दुर्लक्ष करतात, पण वेळेवर काळजी घेतली नाही तर त्वचेची गुणवत्ता कायमस्वरूपी खराब होण्याची शक्यता असते. बाजारातील हायड्रा फेशियल किंवा बोटॉक्स ट्रीटमेंट्स महागड्या असतात आणि काही वेळा परिणामकारकही ठरत नाहीत. यापेक्षा घरीच काही साधे पण प्रभावी उपाय करून त्वचेला नैसर्गिकरित्या सुधारता येते.

कॉफी फेसमास्क हा एक अशाच घरगुती उपायांपैकी एक आहे. यासाठी सुरुवातीला कॉफी पावडर आणि पाणी एकत्र करून उकळावे. उकळलेली कॉफी गाळून घ्यावी आणि त्यात कॉर्न स्टार्च मिसळावा. नंतर त्यात कोरफड जेल आणि विटॅमिन ई कॅप्सूल मिसळून एकसंध जाडसर पेस्ट तयार करावी.

फेसमास्कमुळे त्वचेला मिळतो नैसर्गिक ग्लो

तयार पेस्ट लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुवावा. नंतर संपूर्ण चेहऱ्यावर फेसमास्क लावून हलक्या हाताने मसाज करावा. काही वेळाने तोच मास्क चेहऱ्यावर तसेच राहू द्यावा. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि चेहरा उजळतो. काही दिवस नियमित वापर केल्यास टॅनिंग दूर होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज दिसू लागते.

हे स्क्रब नैसर्गिक घटकांपासून तयार होत असल्याने कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत. नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग सुधारतो, पिग्मेंटेशन कमी होते आणि त्वचेला नवा तजेला प्राप्त होतो.

Title: Remove Tanning at Home with Coffee Mask

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now