नवजात मुलीचा सौदा! सहा दिवसांच्या बाळाची 90 हजारांत विक्री; आई-वडिलांचं धक्कादायक कृत्य

On: January 30, 2025 9:49 AM
Baby Selling
---Advertisement---

Baby Selling l मध्यवर्ती रुग्णालयाबाहेर (Central Hospital) अवघ्या सहा दिवसांच्या बाळाला (Six-Day-Old Baby) 90 हजाराला (90 Thousand Rupees) विकल्याचा (Sale) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह (Parents) दोन मध्यस्थ (Middlemen) व शेख दाम्पत्य (Shaikh Couple) अशा सहा जणांविरोधात (Against Six People) मध्यवर्ती पोलिस ठाण्यात (Central Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-4, मराठा सेक्शन (Maratha Section) विभागात राहणाऱ्या विशाल व सुजाता गायकवाड (Vishal and Sujata Gaikwad) या दाम्पत्याला 22 जानेवारी रोजी मुलगी (Girl) झाली. त्यांना आधीच दोन मुले (Two Children) आहेत. आर्थिक परिस्थिती (Financial Condition) हलाखीची असल्याने 25 जानेवारी रोजी गायकवाड दाम्पत्याने 18 वर्षांपासून मूलबाळ नसलेल्या शेख दाम्पत्याला ओळखीच्या दोन मध्यस्थांमार्फत मुलीला 90 हजारात विकण्याचा निर्णय घेतला.

Baby Selling l आरोपींना अटक :

विशालची आई विजया गायकवाड (Vijaya Gaikwad) ही बाळ पाहण्यासाठी मध्यवर्ती रुग्णालयात आली असता विशालने बाळाला विकल्याची माहिती दिली. त्यांनी विशाल व सून सुजाता या दोघांना बाळाला विकू नको, असा सल्ला दिला. विशाल, सुजाता ऐकत नसल्याने त्यांनी मध्यवर्ती पोलिस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून विशाल, सुजाता, दोन मध्यस्थ व शेख दाम्पत्याला ताब्यात घेऊन बोलते केले. त्यांनी झालेल्या प्रकाराची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक (Arrest) केली.

या घटनेने उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली असून, गरिबी आणि अज्ञानाचा फायदा घेऊन बाळविक्री करणाऱ्या रॅकेटचा (Baby Selling Racket) पर्दाफाश करण्याची मागणी होत आहे.

News Title: Six-Day-Old-Baby-Sold-For-90000-In-Ulhasnagar-FIR-Against-Six-Including-Parents

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now