वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ; एसआयटीने उचललं मोठं पाऊल

On: January 25, 2025 3:45 PM
walmik karad
---Advertisement---

Walmik Karad Property l आवादा कंपनीकडून (Awada Company) दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आणि मस्साजोग (Massajog) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

अमाप संपत्तीचे गूढ आणि एसआयटीचा तपास 

मागील काही दिवसांपासून वाल्मिक कराड, त्याची पत्नी आणि मुलांच्या नावावर राज्यात विविध ठिकाणी संपत्ती असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. साधा घरगडी ते अमाप संपत्तीचा मालक असा वाल्मिक कराडचा प्रवास अनेकांसाठी एक गूढ बनला आहे. इतकी संपत्ती त्याने कशी आणि कुठून मिळवली, याचे कोडे अजूनही उलगडलेले नाही.

Walmik Karad Property l एसआयटी करणार संपत्ती जप्त; न्यायालयात अर्ज दाखल :

आता वाल्मिक कराडची ही सर्व संपत्ती जप्त करण्याची तयारी एसआयटीने सुरू केली आहे. यासाठी बीड (Beed) येथील विशेष न्यायालयात एसआयटीकडून रितसर अर्ज दाखल करण्यात आला आहे.

मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा देखील संकलित करण्यात आला आहे. त्याचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त करण्यात येतील, असे बोलले जात आहे. हा वाल्मिक कराडसाठी एक मोठा धक्का ठरू शकतो.

परदेशातही संपत्ती असल्याचा संशय :

याआधी सीआयडीने (CID) कराडची संपत्ती परदेशात असल्याचा संशय व्यक्त केला होता. अशातच आता एसआयटीने कराडच्या संपत्तीची पाळेमुळे खणायला सुरुवात केल्याचे चित्र आहे. या तपासातून आणखी काय काय खुलासे होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

News Title : SIT to Confiscate Walmik Karad’s Property

 

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now