‘महागड्या भेटवस्तू, पार्ट्या…’; सिद्धार्थ माल्याचा दीपिका पादुकोणवर गंभीर आरोप

On: November 13, 2023 12:08 PM
---Advertisement---

मुंबई | अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सतत चर्चेत असते. आता दीपिकाच्या एका जुन्या नात्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. रणवीरशी लग्न करण्याआधी दीपिकाचं नाव रणबीर कपूर, सिद्धार्थ माल्या, युवराज सिंग यांच्यासोबतही जोडलं गेलं होतं. तसेच तीने व्यावसायिक विजय माल्या यांचा मुलगा सिद्धार्थ माल्यालाही डेट केलं होतं.

आयपीएल मॅचदरम्यान दोघांनी केलेल्या किसची तुफान चर्चा झाली होती. मात्र ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांवर काही आरोप केले होते. ब्रेकअपनंतर दिलेल्या काही मुलाखतींमध्ये दोघांनी एकमेकांबद्दलची नाराजी बोलून दाखवली होती

दीपिकाने महागड्या भेटवस्तू कधीच परत दिल्या नाहीत, अशी तक्रार सिद्धार्थने केलीये. मी तिला दिलेले महागडे डायमंड्स, बॅग्स हे सर्व ती विसरली होती. तिच्या सुट्ट्यांवर खर्च केलेला पाण्यासारखा पैसा, तिच्या मित्रमैत्रिणींना दिलेल्या पार्ट्या या सर्व गोष्टींचा तिला विसर पडला होता, असं सिद्धार्थने बोलून दाखवलं.

दीपिका ही वेडी आहे. मी तिला सांगितलं होतं की माझ्या वडिलांनी त्यांचं कर्ज फेडल्यानंतर आणि सरकारने त्यांना मुक्त केल्यानंतर मी तिचे पैसे परत करेन. पण ती ऐकायला तयारच नव्हती, असंही त्याने सांगितलं होतं.

दरम्यान,  सिद्धार्थ माल्याने गर्लफ्रेंड जास्मिनशी नुकताच साखरपुडा केला. गेल्या काही काळापासून हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

दीपिका आणि सिद्धार्थचं अफेअर खूप चर्चेत होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. आता हॅलोवीनच्या पार्टीत सिद्धार्थने त्याची गर्लफ्रेंड जास्मिनशी साखरपुडा केला आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सिद्धार्थ हा मॉडेल आणि अभिनेतासुद्धा आहे. सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गौतमी पाटीलचा जलवा, ठाणेकरांना म्हणाली… 

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

शरद पवार मराठा की ओबीसी?; पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल

मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी घेतला मोठा निर्णय!

सोनं झालं स्वस्त; वाचा आजचे दर

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now