ठाकरेंची शिवसेना रिकामी होत चालली… तरी हे नेते म्हणतात, टायगर अभी जिंदा है!

On: February 13, 2025 6:48 PM
Shiv Sena Thackeray group Bhaskar Jadhav on Rajan Salvis Exit 
---Advertisement---

Shiv Sena Thackeray group | शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या निर्णयावर ठाकरे गटातील नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी एक भावनिक प्रतिक्रिया देत “ये भी दिन निकल जाएंगे” असे सूचक वक्तव्य केले आहे. (Shiv Sena Thackeray group)

“राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडायला नको होती”

राजन साळवी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी खेद व्यक्त करत सांगितले की, “राजन साळवींनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडायला नको होती. ते पक्षासाठी खंबीर उभे राहायला हवे होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांना एकमेव निष्ठावान नेते म्हणून ओळख दिली होती.”

त्यांनी पुढे सांगितले की, “पक्ष सोडून दुसऱ्या गटात जाणाऱ्या लोकांसाठी आम्ही थांबत नाही. पण हे दिवस निघून जातील, आपण लढत राहू.”

भास्कर जाधव यांनी विनायक राऊत (Vinayak Raut) यांना टोला लगावत सांगितले की, “शिलेदार नेता आणि सरदार आहात म्हणजे हे सरदारकीचे लक्षण नाही. सरदाराने आपल्या सैन्याला धीर द्यावा लागतो. राजन साळवी एकमेव एकनिष्ठ असल्याचे म्हणायचे, आता एकमेव एकनिष्ठ कोण आहे, हे त्यांना रत्नागिरीत आल्यावर विचारा.”

“टायगर अभी जिंदा है” – ठाकरे गटाचा निर्धार

भास्कर जाधव पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांची शिवसेना तोडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. रोज एक नेता फोडण्याचा डाव सुरू आहे. पण आम्ही कुणाला अडवणार नाही, कारण उद्धव ठाकरे दबावाला बळी पडत नाहीत. म्हणूनच, ‘टायगर अभी जिंदा है'”. दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट हा संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे.

Title : Shiv Sena Thackeray group Bhaskar Jadhav on Rajan Salvis Exit 

 

Join WhatsApp Group

Join Now