Shivsena l शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती अजूनही थांबत नसल्याचे चित्र आहे. नाशिकमधून तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत (Shinde Faction) प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक इंदुबाई नागरे, समीना मेमन आणि विक्रम नागरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या बदलाला विशेष महत्त्व दिले जात आहे.
दरम्यान, मुंबईत देखील ठाकरे गटाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि माजी नगरसेवक राजुल पटेल (Rajul Patel) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती, मात्र त्याऐवजी हारून खान यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे त्या नाराज होत्या.
पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही गळती :
उद्धव ठाकरे यांना फक्त नाशिक आणि मुंबईतच नाही, तर पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही मोठे धक्के सहन करावे लागत आहेत. पुण्यात काही माजी नगरसेवक भाजपात (BJP) सामील झाले तर छत्रपती संभाजीनगरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपचा स्वीकार केला आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही गळती उद्धव ठाकरे यांच्यासाठी चिंताजनक मानली जात आहे. राज्यातील प्रमुख महापालिकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शिंदे गट आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
Shivsena l उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांचा मोठा दावा :
उदय सामंत (Uday Samant) यांनी नुकताच दावोस दौऱ्यावर असताना मोठा दावा केला होता की, “शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत आणि लवकरच मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो.”
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनीही असाच दावा करत सांगितलं की, “महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटातून अनेक नेते बाहेर पडतील.”






