शेतकऱ्यांसाठी काय केलं म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींना पवारांनी दाखवली आकडेवारी!

On: October 28, 2023 1:33 PM
---Advertisement---

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शिर्डीत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. केंद्रात कृषीमंत्री असताना शरद पवार (Sharad Pawar) यांना शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल मोदींनी केला. त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत आकडेवारी दाखवत नरेंद्र मोदींना (Narendra Modi) उत्तर दिलं आहे. पंतप्रधानांनी शिर्डीला येऊन साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माझ्या कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पंतप्रधान हे पद ही एक संस्था आहे. संस्थेची प्रतिष्ठा राखली पाहिजे हे मला समजतं. या पदाची प्रतिष्ठा राखून त्यांनी जी माहिती दिली. ती वास्तवापासून दूर असेल तर त्याचं चित्र समोर मांडावं यासाठी मी तुम्हाला बोलावलं आहे, असं शरद पवार म्हणाले.

2004 ते 2014 या काळात मी कृषी मंत्री होतो. 2004मध्ये राज्यात अन्नधान्याची टंचाई होती. शपथ घेतल्यानंतर पहिल्या दिवशी मला कटू निर्णय घ्यावा लागला. तो म्हणजे अमेरिकेतून गव्हाची आयात करणं. कारण देशातील स्टॉक चांगले नव्हते. माझ्याकडे फाईल आली. मी सही केली नाही. मी अस्वस्थ होतो. कृषीप्रधान देश म्हणायचं आणि परदेशातून धान्य आणायचं हे पटत नव्हतं. दोन दिवस फाईल पडून होती, असं शरद पवारांनी सांगितलं.

दरम्यान, आपण गहू आयात केला. त्यामुळे आपली गरज भागली. नंतर शेतकऱ्यांनी पीक उत्पादन वाढीसाठी काही पावलं उचलली पाहिजे. त्यासाठी आम्ही निर्णय घेतले. त्यातील पहिला निर्णय हा तो म्हणजे अन्नधान्य आणि डाळीच्या हमीभावात वाढ कशी करता येईल, अशी माहिती शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now