मुंबई | रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 27 ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या ईमे ल आयडीवर एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा मेला पाठवला आहे.
तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला जीवानिशी मारू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर आहेत, असं त्या धमकीच्या ई-मेलमध्ये लिहीलं होतं.
मुकेश अंबानी आणि अंबानी परिवाराला धमकी मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही एका व्यक्तीने दक्षिण मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलला फोन केला होता. त्याने रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती.
त्या कॉलरने मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांची नावे घेतली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मुकेश अंबानी यांचे ‘अँटिलिया’ हे घर उडवून देण्याची धमकीही देण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या-






