Pahalgam | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहलगाम (Pahalgam) दहशतवादी हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा देशावरील हल्ला असून, यात धर्म-जात-पात आणू नये, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्र सरकारच्या संभाव्य उपाययोजनांना पूर्ण सहकार्य दर्शवले आहे. तसेच, ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) एकत्र येण्याच्या चर्चांवरही त्यांनी सूचक भाष्य केले.
पंतप्रधानांना पूर्ण सहकार्य- शरद पवार
ठाण्यातील (Thane) प्रति तुळजाभवानी मंदिराच्या (Tulja Bhavani Temple) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) माध्यमांशी बोलत होते. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या मंदिराच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला होता. पवार (Pawar) म्हणाले, “पहलगामवरचा हल्ला हा देशावरचा हल्ला आहे. यात ज्यांचे कुटुंबीय शहीद झाले, त्यांनी देशासाठी किंमत दिली आहे. इथे धर्म, जातपात, भाषा या गोष्टी आणायच्या नाहीत.”
“आज भारतीयांवर कोणत्याही शक्तींचा हल्ला होत असेल, तर देशवासीय म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावे लागेल. देशाचे पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी याबाबत जी काही उपाययोजना करत असतील, त्याला आमचे पूर्ण सहकार्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. (Sharad Pawar on Pahalgam Attack)
Pahalgam l ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर सूचक भाष्य
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संभाव्य युतीबद्दलच्या चर्चांवरही शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली. नुकतेच दोन्ही ठाकरे बंधू कुटुंबासह परदेश दौऱ्यावर गेले होते, ज्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आले होते. राज ठाकरे (Raj Thackeray) कालच (२९ एप्रिल) परतले आहेत.
यावर पवार (Pawar) म्हणाले, “दोघे एकत्र येत असतील तर चांगलंच आहे. मात्र, यासंबंधी भाष्य करण्याचा आजचा प्रसंग नाही,” असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले. यापूर्वीही त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देणे टाळले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही ठाकरे बंधू एकत्र आल्यास स्वागतच असेल, असे म्हटले आहे.






