“आदित्य आणि गीतसोबत असते तर…”, शाहीद कपूरचा मोठा गौप्यस्फोट!

On: January 30, 2025 2:33 PM
shahid kapoor
---Advertisement---

Shahid Kapoor | बॉलिवूडचा सुपरहिट रोमँटिक-कॉमेडी चित्रपट ‘जब वी मेट’ मधील आदित्य आणि गीत या जोडीवर शाहिद कपूरने (Shahid Kapoor) मोठे विधान केले आहे. आजच्या काळात जर हे दोन पात्र असते तर त्यांनी घटस्फोटासाठी वकिलाचा सल्ला घेतला असता, असे अभिनेता शाहिद कपूरने म्हटले आहे. शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी ‘देवा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 31 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

इम्तियाज अलीच्या मताशी शाहिद सहमत-

इम्तियाज अली (Imtiaz Ali) दिग्दर्शित (Directed) 2007 साली प्रदर्शित झालेला ‘जब वी मेट’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. परंतु, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शाहिदने (Shahid Kapoor) दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या मताचे समर्थन करताना म्हटले की, “हे मजेशीर असेल की गीत आणि आदित्य एकमेकांपासून वैतागून घटस्फोट घेण्याची तयारी करत आहेत. आदित्य म्हणत असेल की, ‘ती स्वतःचीच फेवरेट आहे, कोण तिला झेलू शकेल?'”

चाहत्यांना निराश न करण्याचा मानस-

शाहिदने (Shahid Kapoor) हे देखील स्पष्ट केले की, तो चाहत्यांना निराश करू इच्छित नाही. तो म्हणाला, “जर आमच्या दिग्दर्शकाला (Director) वाटते की हे दोघे एकमेकांपासून घटस्फोट घेतील, तर मी कोण असतो मध्ये येणारा? मी तर फक्त एक अभिनेता (Actor) आहे.”

‘जब वी मेट’चा सिक्वेल शक्य आहे?

शाहिद आणि करीना (Kareena) यांनी ‘जब वी मेट’नंतर कधीही एकत्र काम केले नाही. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटात दोघेही होते, परंतु त्यांनी स्क्रीन स्पेस शेअर केला नव्हता. जेव्हा ‘जब वी मेट’च्या सिक्वेलबद्दल विचारण्यात आले तेव्हा करीनाने (Kareena) हा निर्णय इम्तियाज अलीवर सोडून दिला पाहिजे, असे सांगितले. तर, शाहिदने गंमतीत म्हटले की, “दिग्दर्शक आता पुढे गेले आहेत.

शाहिद आणि करीनाच्या आगामी चित्रपट-

सध्या शाहिद कपूर त्याच्या आगामी ‘देवा’ आणि विशाल भारद्वाजच्या पुढील चित्रपटात व्यस्त आहे. तर, करीना कपूरने (Kareena Kapoor) नुकतेच ‘सिंघम अगेन’मध्ये (Singham Again) काम केले आहे. चाहत्यांना ‘जब वी मेट’चे पात्र आजही आठवतात आणि ते नेहमीच या क्लासिक चित्रपटासाठी उत्साहित ( असतात.

दरम्यान, सैफची पत्नी करीना कपूरचा पूर्वाश्रमीचा प्रियकर शाहिद कपूरनेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती. शाहिदला सैफवरील हल्ल्याबाबत विचारल्यावर तो म्हणाला की, “ही एक दुःखद घटना आहे. आम्ही सगळेच सैफच्या काळजीत आहोत. त्याच्यासोबत जे घडले ते ऐकून आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सैफ लवकरात लवकर बरा होईल, त्याला चांगले वाटेल अशी मी आशा करतो.”

News Title : Shahid Kapoor’s big statement on Aditya and Geet

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now