Jain Community | जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत (List of Richest People) भारतातील (India) अनेक उद्योजकांची (Entrepreneurs) नावे आहेत. यातील अनेक उद्योजक हे जैन धर्मीय (Jain Community) आहेत. मात्र, फक्त हे उद्योजकच नाही तर जैन धर्माचे सर्वच लोक श्रीमंत (Rich) असतात. यांच्याकडे एवढा पैसा कुठून येतो? भारतातील सर्वात छोटी कम्युनिटी अर्थात लहान समुदाय असलेल्या जैन धर्माचे लोक गरीब का नसतात?
भारतात पारसी (Parsi) आणि जैन (Jain Community) या दोन समुदायाच्या लोकांची संख्या फारच कमी आहे. जैन धर्मात कुणीही गरीब नसते. आकडेवारीवर नजर टाकली असता भारतात जैन धर्मीय लोकांची संख्या फक्त 0.3 टक्के इतकी आहे. असे असले तरीही या धर्माचे लोक सर्वाधिक कर भरतात. भारताच्या इन्कम टॅक्सच्या (Income Tax) एकूण आकडेवारीत सुमारे 24 टक्के इन्कम टॅक्स भरणारे लोक हे जैन धर्माचे आहेत.
जैन समाजाची प्रगती आणि श्रीमंतीची कारणे-
- व्यवसायावर लक्ष केंद्रित: गोल्ड इंडस्ट्री , डायमंड इंडस्ट्री , शेअर मार्केट , कमॉडिटी इंडस्ट्री , एअरलाइन इंडस्ट्री , मीडिया इंडस्ट्री, रिअल इस्टेट सेक्टर अशा अनेक क्षेत्रात जैन समाजाची लॉबी पाहायला मिळते. या समाजाचे लोक नोकरी न करता पारंपरिक व्यवसाय पुढे नेतात.
- लहान वयातच व्यवसायाचे धडे: व्यवसायाच्या बाबतीतले नियोजन ते खूप लहान वयातच शिकतात. यामुळे त्यांची प्रगती लवकर होते. प्रगती झाल्यावर हाती पैसासुद्धा लवकर येतो.
- व्यसनांपासून दूर: जैन धर्माचे लोक कोणतेही व्यसन करत नाहीत. चैनीच्या गोष्टी, पार्टी, मौजमजा यावर जैन धर्मीय लोक पैसा खर्च करत नाहीत. यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होते.
- गुंतवणुकीवर भर: आपल्याकडचा पैसा ते वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये गुंतवतात. यामुळे जैन धर्मीय विविध व्यवसायाच्या माध्यमातून पैशाला पैसा जोडत राहतात.
- समाजाचा पाठिंबा: जैन धर्मीय फक्त पैसे कमवून नाही, तर नाव कमवून, धर्म प्रतिष्ठा आणि स्वास्थ्य जपून सर्व बाजूने श्रीमंत असतात. जैन धर्माचे लोक फक्त स्वतःच्या प्रगतीवर फोकस करत नाहीत. जैन धर्मातील लोक त्यांच्या समाज बांधवांना देखील व्यवसायात प्रगती करण्यासाठी मदत करतात.
या सर्व कारणांमुळे जैन धर्मात (Jain Community) गरिबीचे प्रमाण नगण्य आहे आणि ते भारतातील सर्वात श्रीमंत समुदायांपैकी एक आहेत. थोडक्यात, जैन धर्मीयांच्या यशाचे रहस्य त्यांच्या व्यवसायावरील लक्ष, काटकसर, गुंतवणूक आणि एकमेकांना मदत करण्याच्या वृत्तीमध्ये दडले आहे.






