SBI Rules l देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ATM वापराबाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. 1 मे 2025 पासून हे नवे नियम (SBI New Rule) लागू होणार असून SBI खातेधारकांना याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. बदलांनुसार, मोफत व्यवहारांची मर्यादा, शुल्क आणि विविध सुविधा नव्याने निश्चित करण्यात आल्या आहेत.
ATM ट्रान्झॅक्शन चार्ज आणि फ्री युज लिमिट यामध्ये झालेले हे बदल ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम करणारे आहेत. यानुसार, आता मासिक फ्री व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 15 ते 23 रुपये आणि त्यावर जीएसटी आकारला जाणार आहे.
फ्री व्यवहारांची मर्यादा काय? :
SBI च्या ATM वर दर महिन्याला 10 फ्री ट्रान्झॅक्शन, तर इतर बँकांच्या ATM वर 5 मोफत व्यवहार करता येणार आहेत. मात्र ही मर्यादा फक्त निवडक शिल्लक असलेल्या खात्यांसाठी आहे. 25,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत सरासरी शिल्लक असलेल्या खात्यांना या सुविधा मिळतील. 1 लाख रुपयांपेक्षा जास्त शिल्लक असल्यास कोणतीही मर्यादा लागू होणार नाही. (SBI ATM Rule Change)
ATM व्यवहारांची मोफत मर्यादा ओलांडल्यानंतर, SBI ATMवर दर व्यवहारासाठी ₹15 + GST, तर इतर बँकांच्या ATM वर ₹21 + GST शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, बॅलन्स इन्क्वायरी आणि मिनी स्टेटमेंटसारख्या सेवा SBI ATMवर मोफत राहतील, पण इतर बँकांमध्ये यावरही ₹10 + GST शुल्क लागेल.
SBI Rules l ट्रान्झॅक्शन फेल झाल्यासही शुल्क :
जर खात्यावर शिल्लक रक्कम नसेल आणि ट्रान्झॅक्शन फेल झाले, तरी ग्राहकाला ₹20 + GST शुल्क भरावे लागेल. त्यामुळे ATM वापरण्यापूर्वी खात्यात पैसे आहेत की नाही, याची खात्री करूनच व्यवहार करावा, असा सल्ला बँकेने दिला आहे. (SBI ATM Rule Change)
दरम्यान, SBI कडून सुचवण्यात आले आहे की ग्राहकांनी स्वतःच्या व्यवहारांची माहिती ठेवावी आणि फ्री लिमिट ओलांडली जात नाही ना याची सतत खात्री करावी. यामुळे अनावश्यक शुल्क टाळता येईल. तसेच मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग यासारख्या पर्यायी सेवांचा वापर केल्यास बचत होऊ शकते.






