“वाल्मिक अण्णाचा माणूस आहे, 2 कोटी दे नाहीतर…”; सुदर्शन घुलेबाबत नवा जबाब समोर

On: March 29, 2025 10:03 AM
Santosh Deshmukh Case Sudarshan Ghules 2 Cr Threat
---Advertisement---

Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी जबाब समोर आला आहे. चहाच्या टपरीवर चहा पिणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या या जबाबामुळे आरोपींची अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः खंडणी आणि धमकीबाबतचे तपशील स्पष्ट झाल्याने, गुन्ह्याचे स्वरूप गंभीर स्वरूप घेत आहे. (Santosh Deshmukh Case)

प्रत्यक्षदर्शीकडून धक्कादायक खुलासा 

6 डिसेंबर 2024 रोजी दुपारी साडेबारा वाजता सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि त्याचा एक साथीदार आवादा एनर्जी कंपनीच्या (Awada Energy Company) गेटसमोर आले. तिथे उपस्थित असलेल्या चहाच्या टपरीवरील प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार, सुदर्शन घुलेने सुरुवातीला वॉचमनला शिवीगाळ केली. त्यानंतर तेथे आलेल्या कंपनी अधिकारी शिवाजी थोपटे यांना उद्देशून सुदर्शनने स्पष्ट धमकी दिली – “मी वाल्मिक कराडचा (Valmik Karad) माणूस आहे. कंपनी चालू ठेवायची असेल तर अण्णाला 2 कोटी रुपये द्या.”

याचवेळी घटनास्थळी पोहोचलेले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांनी कंपनी बंद करू नये, गावातील लोकांना रोजगार मिळू द्या, अशी विनंती सुदर्शन आणि त्याच्या साथीदारांना केली. मात्र, सुदर्शनने ही विनंती धुडकावून सरपंचांना उद्देशून गंभीर धमकी दिली – “तुला जिवंत सोडणार नाही, तुला बघून घेऊ.” हा प्रत्यक्षदर्शी जबाब आता खटल्यामध्ये निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

धनंजय देशमुख यांची मोठी मागणी 

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना धनंजय देशमुख यांनी सांगितले की, त्यांच्या भावाचा खून हा फक्त वैयक्तिक वैर नाही, तर संघटीत गुन्हेगारीचे थेट उदाहरण आहे. त्यांनी यापूर्वीच म्हटले होते की अपहरण आणि हत्या करणारे सर्व आरोपी एकच आहेत.

धनंजय देशमुख यांनी सरकारकडे स्पष्ट मागणी केली आहे की, या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि संपूर्ण खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा. जेणेकरून लवकरात लवकर न्याय मिळू शकेल.

Title : Santosh Deshmukh Case Witness Reveals Sudarshan Ghules 2 Cr Threat

 

Join WhatsApp Group

Join Now